Download App

संजय राऊत ‘मेरा नाम जोकर’मधला जोकर, नारायण राणेंनी डिवचलं…

Narayan Rane Vs Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबियांमध्ये वाकयुद्ध याआधी अनेकदा झालं आहे. आताही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्ह एकदा डिवचलं आहे. संजय राऊत मेरा नाम जोकरमधला ‘जोकर’ असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊतांना डिवचलं आहे.

उद्धव ठाकरे उद्धट म्हणूनच त्यांनी… राजीनाम्याच्या मुद्द्यावर नारायण राणेंची जळजळीत टीका

मंत्री नारायण राणे म्हणाले, संजय राऊत दररोज सकाळी उठून मीडियासमोर उभा राहतो. हा वृत्तपत्राचा संपादक आहे की कोण आहे? हाच प्रश्न मला पडलाय. आता संजय राऊत मंडळींचा पालापाचोळा झाला असून संजय राऊत मेरा नाम जोकरमधला जोकर असल्याचं राणे म्हणाले आहेत.

फडणवीसांच्या कपटकारस्थानावर आज शिक्कामोर्तब; सुषमा अंधारेंचा घणाघात

सत्तासंघर्षाच्या निकालावर संजय राऊत वृत्तपत्रात छापतात, “आज 16 आमदार अपात्र होणार आहेत. संजय राऊत यांनी काय ज्योतिष सुरु केलं आहे काय? त्यांना वैचारिकता तरी समजते का? असे सवाल करीत त्यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Video : तुम्ही नैतिकतेवर बोलूच नका, फडणवीसांनी ठाकरेंना फटकारले

संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलत आहेत. नरेंद्र मोदींनी हे करायला नको होतं ते करायला नको होतं, असं कायम राऊत बोलत आहेत. त्यांना सल्ला देणारे हे मोदींच सल्लागार आहेत का? असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्या माणसावर केसेस आहेत, जेलमध्ये जाऊन येतो, त्या माणसाला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच पत्रकारांनी संजय राऊत हा विषय सोडला पाहिजे, जर हा विषय सोडला तर उद्या तो दिसेनासा होणार असल्याचंही नारायण राणे म्हणाले आहेत.

Tags

follow us