आजच्या काळात आमदाराकी, खासदारकी मागितली जाते पण मावळे निस्वार्थ लढले

Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांवर (chatrapati sambhaji maharaj) मावळ्यांची निष्ठा, प्रेम होतं. पण आताच्या काळात एखादी कामगिरी केली तर आमदारकी, खासदारकी मागितली जाते पण हिरोजी इंदुलकरांनी किल्ला बांधल्यावर फक्त मंदिराच्या पायरीवर नाव लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. भारतीय नौदल दिनाच्या (Navy Day) निमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र […]

Narayan Rane

Narayan Rane

Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांवर (chatrapati sambhaji maharaj) मावळ्यांची निष्ठा, प्रेम होतं. पण आताच्या काळात एखादी कामगिरी केली तर आमदारकी, खासदारकी मागितली जाते पण हिरोजी इंदुलकरांनी किल्ला बांधल्यावर फक्त मंदिराच्या पायरीवर नाव लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले.

भारतीय नौदल दिनाच्या (Navy Day) निमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यंदा प्रथमच नौदल दिन सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणमध्ये साजरा होत आहे.

नारायण राणे म्हणाले की रायगड किल्ला बांधून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना बोलावून घेतलं आणि किल्ल्याच्या बांधकामाचं कौतुक केलं. महाराज म्हणाले की बोला काय पाहिजे तुम्हाला? आजचा काळ असता तर कोणी आमदाराकी, खासदारकी मागितली असती, पण त्यावेळी इंदुलकर म्हणाले, महाराज मला काही नको. फक्त गडावरल्या मंदिराच्या पायरीवर नाव लिहिण्याची परवानगी द्या. मला तुमच्या पायशी असूद्या. त्यावेळेच्या मावळ्यांमध्ये निष्ठा, प्रेम होते. याचा प्रत्यय आणून देणारा हा प्रसंग आहे. निष्ठा, प्रेम देशासाठी कसं द्यावं याचे हे प्रतिक आहे, असं नारायण राणे म्हणाले.

रेवंथ रेड्डीच होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; खर्गेंकडून शिक्कामोर्तब, आजच शपथविधी

ते पुढं म्हणाले की नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यातील तीन राज्य जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवणमध्ये आले आहेत. आम्हाला आमच्या पंतप्रधानांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, घमंड आहे. जिथं जातील तिथं यश घेऊन येतात, असा त्यांचा पायगुण आहे. त्यांनी काल जो विजय मिळवला तो आत्तापर्यंतचं 9 वर्षातील काम होतं. हे या देशातील जनतेने दाखवून दिलं. आपला देश आत्मनिर्भर बनावा यासाठी त्यांचे प्रत्यत्न आहे. यासाठी ते मेहनत घेत आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

Exit mobile version