Download App

Nilesh Rane चं वादग्रस्त ट्विट… ‘पवार कुटुंब पूर्ण *** मेंदूचं’

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी (Sharad Pawar) टीका केली होती. पवारांच्या त्या विधानावर भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) वादग्रस्त ट्विट केलं आहे. ‘पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे,’ असे म्हटले आहे.

निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे. आयुष्यभर फक्त टोप्या लावायचं काम पवार कुटुंबाने केलं, मी मागे बोललो होतो फडणवीस साहेब जेव्हा पहाटेच्या शपथविधी बद्दल महाराष्ट्राला सांगतील तेव्हा पवारांना तोंड लपवायला जागा राहणार नाही’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

निलेश राणेंनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘देवेंद्र फडणवीस साहेब सुसंस्कृत आहेत याचा दाखला पवार कुटुंबाने देण्याची गरज नाही ते आहेतच हे महाराष्ट्राला माहित आहे म्हणून अजून पर्यंत पहाटेच्या शपथविधीचा पुरा पिक्चर दाखवला नाही. ज्या दिवशी तो पिक्चर बाहेर पडेल तेव्हा पवार कुटुंबाचे भलतेच वांदे होतील म्हणून गप रहा’, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

Pune Bypoll election : कसब्यात ‘या’ दोन दिवशी, ड्राय डे !

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की, ‘देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे तरीही ते असत्याचा आधार घेत असं बोलतील मला कधी वाटलं नाही, असे म्हटले होते.

Tags

follow us