आनंदाची बातमी ! रायगडावर आता अत्याधुनिक रोपवे; शिवभक्तांना 50 ते 100 रुपयांत गडावर जाण्याची सुविधा

Raigad-रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवेकडून प्रतिव्यक्ती दोन्ही बाजूंचे 375 रुपये (प्रौढ) आणि 275 रुपये (लहान मुले/ज्येष्ठ नागरिक) दर आकारले जातात.

Ropway Raigad

Ropway Raigad

रायगड: दुर्गराज रायगडावर (Raigad) जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र शासनाने रायगडावर नवीन अत्याधुनिक रोपवे (Ropeway) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा रोपवे शासकीय निधीतून उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाकडून मान्यता मिळाली आहे. गडावर खासगी रोप वे आहे. यासाठी प्रतिव्यक्ती सुमारे 375 तिकीट दर आहे. नवीन रोप वेचे तिकीट केवळ 50 ते 100 रुपयांच्या दरम्यान ठेवण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे शिवभक्त, पर्यटकांना रायगडावर जाणे अधिक स्वस्त, सुलभ आणि सर्वसामान्यांना परवडणारे होणार आहे.

सध्या रायगडार खासगी रोपवे आहे. या रोपवेच्या तिकिटाचा दर जास्त असल्यामुळे अनेक शिवभक्त आणि पर्यटक पायी गड चढण्याचा पर्याय निवडतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांगांसाठी हा खर्च अडथळा ठरत होता. मात्र नवीन शासकीय रोपवे सुरू झाल्यानंतर कमी खर्चात आणि कमी वेळेत गडावर पोहोचणे शक्य होणार आहे.

Nitin Gadkari : नितीन गडकरींना धक्का; मंत्रालयात होणार फेरबदल; PM मोदी घेणार मोठा निर्णय?

खासगी रोपवेचे तिकीट महाग
रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवेकडून प्रतिव्यक्ती दोन्ही बाजूंचे 375 रुपये (प्रौढ) आणि 275 रुपये (लहान मुले/ज्येष्ठ नागरिक) दर आकारले जातात. याशिवाय गडावरील संवर्धनाच्या कामांसाठी नेण्यात येणाऱ्या साहित्यावर प्रतिकिलो 6.30 रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे विकास आणि संवर्धनाच्या कामांचा खर्च सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढतो.


Maharashtra Rain Alert : आज वादळी पाऊस; पुणे, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांना येलो – ऑरेंज अलर्ट


आठ वर्षानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाची रोपवेसाठी मंजुरी

याच पार्श्वभूमीवर शासनाच्या मालकीचा अत्याधुनिक रोपवे उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या प्रस्तावासाठी 2018 पासून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून दिल्लीतील पुरातत्त्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पुरातत्त्व विभागाने नवीन शासकीय रोपवे उभारण्यास मंजुरी दिली आहे.नव्या रोपवेमध्ये प्रतिव्यक्ती कमाल 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी तिकीटदर ठेवण्याची योजना आहे. तसेच गडाच्या संवर्धनासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक नाममात्र दरात किंवा परिस्थितीनुसार शक्य असल्यास नि:शुल्क करण्याचाही विचार आहे. त्यामुळे रायगडावरील संवर्धन आणि विकासकामांसाठी होणाऱ्या वाहतूक खर्चात कोट्यवधी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version