Download App

थोरल्या पवारांवर टीका, पण धाकट्या पवारांच्या घोटाळ्याचा उल्लेखही नाही; ठाकरेंची मोदींवर टीका

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray raigad speech : काल शिर्डीत विविध विकासकामाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या (Narendra Modi) हस्ते झालं. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल केला. पण त्यांनी काल सत्तर हजार कोटींचा उल्लेख केला नाही. कारण, मोदींच्या शेजारी काल स्टेजवर कुणीतरी बसलं होतं, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी आणि अजित पवारांवर टीका केला.

Martha Reservation मध्ये तूर्तास हस्तक्षेप टाळत; केंद्राने अंग काढून घेतले? 

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते आदी उपस्थित आहेत. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कार्यक्रमस्थळी आलो तेव्हा वाटलं की मी आत्ताच्या मुख्यमंत्र्याच्या सभेला आलो आहे की काय? कारण समोरच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. सत्तेतील नेत्यांमध्ये मंत्रीपदाच्या खुर्च्यासाठी भांडणं होतात. मात्र, सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, असा टोला सत्ताधारी नेत्यांना लगावला.

ते म्हणाले, पीएम मोदी काल राज्यात येऊन गेले. ते मराठा आरक्षणाबद्दल काही तरी बोलतील असं वाटलं. मात्र, ते काहीच बोलले नाही. देशातील ज्वलंत मुद्द्यांवर मोदी काहीच बोलत नाही. त्यांनी मणिपूरविषयी काही भूमिका घेतली नव्हती. आताही मराठा आरक्षणावरही ते काहीच बोलले नाहीत. पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असं मोदी म्हणतात. पण, मनमोहन सिंग पंतप्रधान असतांना शरद पवार हे कृषिमंत्री होते, तेव्हा पवारांनी 70 हजार कोटींची कर्जमाफी केली होती, असं ठाकरे म्हणाले.

आज व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना शेकापचे नेते आहेत. कधीकाळी आमच्यात मारामारी व्हायची. आता आम्ही एकत्र आलो. कारण, आम्ही वैरभानाने राजकारण करत नाही. आमचा जो विरोध होता. तो व्यक्तीगत नव्हता. शरद पवारांची आणि बाळासाहेबांची मैत्री जगजाहीर होती. आज मात्र, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना संपवल्या जातं, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

हल्ली बॅंक चालवणं जिकरीचं झालं. कारण, बुडीत खाती खूप असतात. बॅंक काढण्याची इच्छा असले तर जो बॅंक काढायला इच्छुक आहेत, त्याची स्वीमिंग टेस्ट घ्यावी. तुला पोहता येतं ना… बुडणार तर नाही… बुडणार नसेल तरच काढ बॅंक, असंही ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केली. ठाकरे म्हणाले, जे गुन्हेगार आणि गद्दार आहेत, त्यांना टकमक टोक दाखवायची वेळ आली आहे. कारण, ईडीची टाच येत म्हटलं की, काही पलीकडे गेले. हे मिंधे राजकारण राजकरण कधी झालं नव्हतं. आता आम्ही हुकूमशाहीला गाडण्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

follow us