Download App

Rajan Salvi : ‘प्रकल्पाला समर्थनच….’; रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाच्या आमदाराचा पाठिंबा

  • Written By: Last Updated:

Support for the project on the issue of unemployment in Konkan : कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या (Refinery Project) कामाला सुरूवात झाली. मात्र, या प्रकल्पावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सरकारचे ऑफिसर या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला येणार हे कळताच नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. मागील 2 दिवसांपासून स्थानिक नागरिक आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह ठाकरे गटानेही बारसूतील सर्वेक्षण त्वरित थांबवण्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशातच आता ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला (refinery project)आपला पाठिंबा दर्शवला आहे.

कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोकणातील युवक हा वर्ग रोजगार मिळवण्यासाठी मुंबईत स्थायिक झाला आहे, मात्र, हा प्रकल्प कोकणाच्या भूमीत आल्यास इथल्या बेरोजगार युवकांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागणार नाही. त्यांना इथेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील , असं सरकार सांगत आहे. दरम्यान, याच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कोकणातील प्रकल्पाला समर्थन आहे, असं राजन साळवी म्हणाले. त्यांनी आज ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी स्थानिकांना या प्रकल्पाची जमेजी बाजू पटवून देण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

राजन साळवी यांनी ट्विट केलं की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्यावर प्रकल्पाला समर्थनच…. माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी, त्यांच्यावर अन्याय करून नये, अशी मागणी साळवी यांनी केली.

Rajan Salvi : ‘प्रकल्पाला समर्थनच….’; रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाच्या आमदाराचा पाठिंबा

दरमयान, ठाकरे गट स्थानिक नागरिकांच्या बाजूने असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत. खुद्द उध्दव ठाकरे, संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवत स्थानिकांना पाठिंबा दिला. मात्र, ठाकरे गटाचे स्थानिक आमदार मात्र प्रकल्पाच्या बाजूने, आहेत. राजन साळवी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवल्याने या प्रकल्पावरून पक्षात एकमत नसल्याचं समोर येत आहे.

बारसू परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. या प्रस्तावित रिफायनरीला हजारो स्थानिकांचा विरोध आहे. पोलिस प्रशासनाने विरोध करणाऱ्या हजारो आंदोलन कर्त्यांना अटक केली आहे. या प्रकल्पात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सगळ्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

 

Tags

follow us