उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे थोडक्यात बचावले, स्पीड बोटला अपघात!

रायगड : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले. दोघेही सुखरूप आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे एकाच बोटने प्रवास करत होते. बोट चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा […]

Uday Samant And Sambhajiraje Chhatrapati 99215522

Uday Samant And Sambhajiraje Chhatrapati 99215522

रायगड : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले. दोघेही सुखरूप आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे एकाच बोटने प्रवास करत होते. बोट चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजी राजे आणि उदय सामंत हे एकत्र गेट ऑफ इंडियावरून अलिबागला जात होते. तेथे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार होती. यावेळी मांडवा येथे हा अपघात झाला. बोट चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोट खांबाला घासली परंतु चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवत बोट किनारी लावली. अपघात नंतर छत्रपती संभाजी राजे आणि उदय सामंत हे एकत्र रस्त्याने बैठकीच्या ठिकाणी पोहचले.

राहुल गांधींसोबत नानांची रिलॅक्स भेट; पदाचे टेन्शन गेले 

अपघाताबाबत सांगताना उदय सामंत म्हणाले की ते मांडवा येथे बैठकीसाठी जात होते. यावेळी सुरुवातीला काय घडत होते हे काही कळाले नाही. जेव्हा बोट खांबाला धडकली तेव्हा काहीतरी भयंकर घडले असे वाटले. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. आम्ही दोघेही सुखरूप आहोत.

Exit mobile version