Download App

Ladaki Bahin yojana : दीड हजार मिळवणं आणखी सोप्पं, सरकारने केला ‘हा’ मोठा बदल

31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांचे नाव वगळण्यासाठी आणि जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी लागणारे 33 रुपये शासकीय शुल्क माफ

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री लाडकी बही (Ladaki Bahin yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे नाव शिधापत्रिकेवर असणे आवश्यक आहे. दरम्यान, रेशनकार्डमध्ये नाव लावण्यासाठी आवश्यक असलेली 33 रुपये शासकीय फी 31 ऑगस्टपर्यंत माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी दिली.

आश्वासन नको अंमलबजावणी हवी, दूध दराच्या प्रश्नावरून रुपवतेंचा हल्लाबोल 

भुजबळ म्हणाले की, राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेसाठी नावनोंदणी आणि अर्ज करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. या योजनेसाठी रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी महिलांना रेशनकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्यावीत. अर्जदार महिलेने रेशनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असं भुजबळ म्हणाले.

जागा वाटपावरून फिसकटले तर….काँग्रेसचा ‘प्लॅन बी’; सर्वच मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविले ! 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने देण्यात यावे. तसेच रेशनकार्डसह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अडवणमूक, दिरंगाई, पैशाची मागणी केल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशा सुचनाही भुजबळांनी विभागाला दिल्या आहेत.

ते म्हणाले, रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रे देण्यात दिरंगाई होत असल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. लाडक्या बहिणींना कोणत्याही कारणाने अडथळे येणार नाहीत याची काळजी घ्यावी, ही प्रक्रिया पारदर्शपणे आणि जलदगतीने व्हावी, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांनी संनियंत्रण ठेवावे, असे निर्देश भुजबळांनी दिले.

31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांचे नाव वगळण्यासाठी आणि जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी लागणारे 33 रुपये शासकीय शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचंही भुजबळांनी सांगितलं. सरकारच्या या निर्णयामुळं महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

follow us

वेब स्टोरीज