Lakshman Hake : साताऱ्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
ऊर्जा स्थळावर येऊन कोट्यवधी रुपयांचा निधी दिला म्हणजे काही वेगळे किंवा मोठे काम केल्याचा आव आणू नये, असा टोला देखील यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला लावला.
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ऊर्जा स्थळावर येऊन सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी निधी दिला म्हणजे सरकारने उपकार केले, असे होत नाही. नेमके ओबीसींसाठी आणि दीन-दुबळ्यांसाठी राज्य सरकारने काय केले, हा खरा प्रश्न असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले.
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानींच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसोबत ऐतिहासिक करार
उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारकडून निधी दिल्याचा डांगोरा पिटला जात असला, तरी त्यातून ओबीसी समाजाचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. केवळ निधी जाहीर केल्याने खूप काही केले, असे मानता येणार नाही, अशी जहरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. तर दुसरीकडे राज्य सरकारने मराठी आरक्षणासाठी जारी केलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
यशच्या ‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ मधून नयनताराचा पहिला लूक प्रदर्शित
