Download App

लक्ष्मण हाकेंनी दोन वर्षांपासून पगारचं दिला नाही, पाच वर्षांपासून गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा आरोप

Sachin Bandgar On Laxman Hake : ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मण हाकेंनी ( Laxman Hake) गेल्या

Sachin Bandgar On Laxman Hake : ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मण हाकेंनी ( Laxman Hake) गेल्या 5 वर्षांपासून पगार न दिल्याचा आरोप त्यांच्या ड्रायव्हर सचिन बंडगर (Sachin Bandgar) यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील एक्स वर पोस्ट करत लक्ष्मण हाके यांनी ड्रायव्हरला पगार दिला नसल्याचा आरोप केला होता. तर आता ड्रॉयव्हर सचिन बंडगर यांनी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याने हाके पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.

लक्ष्मण हाके यांनी पत्नीला नोकरीला लावतो असा आमिष दाखवून मला राबवून घेतला असा आरोप ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी केला आहे. तसेच मी त्यांना पगार मागितल्याने त्यांनी माझ्या भावाला धमकावलं असा आरोपही माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांचे ड्रॉयव्हर सचिन बंडगर यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना सचिन बंडगर म्हणाले की, मी गेल्या पाच वर्षांपासून हाकेंचा ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. हाके साहेब समाजाचा काम करत असल्याने मी त्यांना गेल्या तीन वर्षांपासून पगार मागितलेला नाही. मी काम सोडत असताना हाके साहेब मला म्हणाले की, मी तुला पगार देतो. काही घरच्या अडचणी आहे असं म्हणून त्यांनी मला वापरुन घेतले. तसेच माझ्या पत्नीला नोकरीला लावतो म्हणत त्यांनी माझा वापर केला असा आरोप सचिन बंडगोर यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केला आहे.

पहिले नकार मग सतेज पाटलांसमोर सुनावणी; निलेश चव्हाण शस्त्रपरवान्यात मोठी अपडेट समोर…

माझा मुलगा आजारी असताना माझ्या पैसांसाठी मी त्यांना कॉल केला मात्र त्यांनी माझा फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी माझ्या भावाला कॉल करुन धमकी दिली. मात्र आता मला माझा पगार मिळाला नाही तर मी लक्ष्मण हाके विरोधात आंदोलन करणार असा इशारा देखील त्यांनी यावेळी हाकेंना दिला. जर न्याय मिळाला नाही तर मंत्रायलासमोर उपोषण करणार असं सचिन बडंगर म्हणाले.

follow us