Download App

“… म्हणून बदल घडवला;” Gautami Patil म्हणते, अश्लीलपणा मी सोडलाय…

  • Written By: Last Updated:

सातारा : खोजेवाडी येथे ५ वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गौतमी पाटील हिचे चाहते उपस्थित राहिले होते. (Satara) गौतमी पाटील हिने अनेक गाण्यांवर आपल्या नृत्याविष्काराने (Dance) तरुणाईला नाचण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी साताऱ्यात कार्यक्रम करून खूप चांगला अनुभव आला असल्याचे तिने सांगितलं आहे. अलीकडच्या दिवसात कार्यक्रमाच्या निमित्ताने सारखा येण्याचा योग येत असल्याचे गौतमी पाटील म्हणाली. साताऱ्याचे लोकं खूप चांगले आहेत. त्यांचे प्रेम बघून खूप छान वाटलं. या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

अश्लीलपणा मी सोडलाय…

गौतमी पाटील म्हणाले, अगोदर माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत. यामुळे मी बदल घडवला. आणि मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत. आणखी काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न करत आहे. मला कुणाला देखील वाईट म्हणायचं नाही. माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत. पण, या चुका मी परत करत नाही. त्यात खूप सुधारणा होत आहेत. यामुळे काय सुधारणा झाल्या आहेत. त्या बघा त्यानंतर तुम्ही काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. अश्लीलपणा मी सोडलाय असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

‘हल्ला करण्यासाठी माझी सुरक्षा काढण्यात आली’; Bhaskar Jadhav यांचा Fadanvis यांच्यावर गंभीर आरोप

गौतमी पाटील पुढे असे देखील म्हणाली की घुंगरू चित्रपट येतोय. तसेच दोन-तीन गाणे येणार आहेत. हे पण तुम्ही बघाल. प्रेम द्या, अशी विनंती तिने तिच्या चाहत्यांनी केली. आणखी साताऱ्यात एक- दोन आर्डर असल्याचे देखील गौतमी पाटील हिने सांगितलं. गौतमी पाटील ही मूळची धुळे जिल्ह्यातली आहे. गौतमी पाटील हिला खान्देश कन्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ती मूळची धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील आहे. त्यामुळे खान्देशात एका कार्यक्रमात गौतमी पाटीलचा खान्देश कन्या म्हणून गौरव करण्यात आला होता.

Tags

follow us