Download App

तरुणांना संधी देणे शरद पवार यांच्याकडून शिकलो; अजित पवार म्हणतात…

  • Written By: Last Updated:

१९९५ साली शरद पवार यांनी अजित पवार, जयंत पाटील, आर आर पाटील अशी तरुण फळी तयार केली. त्यानंतर सध्या अजित पवार देखील राष्ट्रवादीमध्ये नवीन तरुण फळी तयार करत आहेत. अजित पवार म्हणाले की सध्या पुणे आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आमदारांची पूर्णपणे तरुण फळी आहे.

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी राष्ट्रवादीमध्ये अजित पवार कशा पद्धतीने नवीन फळी तयार करत आहेत. असा प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर दिलखुलास उत्तर दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

१९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना केली. राज्य पुढे नेताना वेगवेगळ्या भागातील, वेगवेगळ्या समाजातील तरुण नेते पारखायचे असतात. शरद पवार यांनी तेच केले. त्यांनी १९९९ साली शरद पवार यांनी सर्व तरुण नेत्यांना संधी दिली. आज नगरमध्ये राष्ट्रवादीचे सहाच्या सहा तरुण आमदार आहेत. पुण्यात देखील जवळपास सर्वजण तरुण नेते आहेत. अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली.

नगर जिल्हात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा आमदार आहेत. यामध्ये डॉ. किरण लहामटे, रोहित पवार, निलेश लंके, संग्राम जगताप अशी सर्व तरुण मंडळी आहेत. अशी माहिती अजित पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

दरम्यान, राष्ट्रवादीकडे आजपर्यंत बहुतांशवेळा उपमुख्यमंत्रिपद राहिलंय, यावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीकडेच उपमुख्यमंत्रिपद का राहिल्याची स्पष्टोक्ती दिलीय. पवार म्हणाले, 2004 साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकत होता. त्यावेळी राष्ट्रवादीला 71 विधानसभेच्या जागा तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या.

मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याची सर्वच काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता होती. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानूसार राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील हे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी दिल्लीत नेमकं काय घडलं? याबाबत मला माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण पक्षाच्या शिस्तेसाठी वरिष्ठांचा आदेश पाळावा लागतं असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us