Rohit Pawar On Uddhav Thackeray : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना निवडणूक आयोगाने राज्यातील 9 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
तर दुसरीकडे जर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वत: विधानपरिषदेसाठी इच्छुक असतील तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (NCPSP) पाठिंबा राहील असं माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: इच्छुक असतील तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नक्कीच पाठिंबा राहील. राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवारा यांना पाठींबा देण्यात उद्धव ठाकरे यांनी सर्वात प्रथम पुढाकार घेतला होता. ठाकरेंना पुन्हा आमदार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.
या आमदारकीवर उद्धव ठाकरे यांचा हक्क आहे. आम्ही खासदारकी घेतल्याने आम्ही हक्क सांगणार नाही असं माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरावे – रोहित पवार
माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षण विधेयकावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरावे.
युद्धानंतर आता नवीन वाद; इस्त्रायलचा मोठा निर्णय अन् 16 मुस्लिम देश भडकले, प्रकरण काय? –
मराठी ठेकेदाराचे केंद्र सरकारकडे एक लाख कोटी रुपये प्रलंबित आहेत. ते पैसे त्यांना दिले जात नाही. ठेकेदारावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. गुजराती आणि आंध्र प्रदेशमधील मोठ्या मोठ्या ठेकेदारांना वेळेत पैसे मिळतात असं देखील यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.
