ट्रॉलीमध्ये बिबट्या अन् तरुणाचा एकत्र मुक्काम; श्रीगोंद्यात किर्रर्र अंधारात घडला थरकाप उडवणारा प्रसंग

ट्रॉलीमध्ये मी सुरक्षित पण, ज्या मृत्यूपासून वाचण्याचा प्रयत्न केला, तोच मृत्यू त्याच्या उशाशी येऊन बसला...

ट्रॉलीमध्ये बिबट्या अन् तरुणाचा एकत्र मुक्काम; श्रीगोंद्यात किर्रर्र अंधारात घडला थरकाप उडवणारा प्रसंग

ट्रॉलीमध्ये बिबट्या अन् तरुणाचा एकत्र मुक्काम; श्रीगोंद्यात किर्रर्र अंधारात घडला थरकाप उडवणारा प्रसंग

Leopard & Youth In One Trolley Shocking Incident In Srigonda : रात्रीची वेळ… चोहोबाजूंनी पसरलेला किर्रर्र अंधार… अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एक तरुण, गव्हाच्या पिकाला पाणी देऊन थकल्यामुळे शेतातल्या एका ट्रॉलीमध्ये विसावला. पण अचानक पायानजीक साक्षात बिबट्या रूपी ‘यमराज’ येऊन बसले. त्याला वाटलं, ट्रॉलीमध्ये मी सुरक्षित आहे… पण त्याला काय माहित होतं, की ज्या मृत्यूपासून तो वाचण्याचा प्रयत्न करतोय, तोच मृत्यू त्याच्या उशाशी येऊन बसणार आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय देणारी ही थरारक घटना नेमकी कशी घडली? पाहूया…

श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एक तरुण रात्रीच्या वेळी शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास बिबट्यापासून बचाव व्हावा म्हणून तो तरुण शेतातील ट्रॉलीमध्ये झोपायला गेला. पहाटे चारच्या सुमारास तरुणाला आपल्या पायानजीक काहीतरी हालचाल जाणवली. पांघरुण बाजूला सारून पाहतो तर काय? समोर साक्षात बिबट्या बसलेला. काळजाचा ठोका चुकला, शरीराचा थरकाप उडाला. पण त्या क्षणी त्या तरुणाने कमालीची ‘समयसूचकता’ दाखवली.

पायाशी यमरूपी बिबट्या असताना त्या तरुणाने शरीराची कोणतीही हालचाल केली नाही. आरडाओरडा न करता, बिबट्याला न डिवचता तो शांत पडून राहिला. काही मिनिटे हा मृत्यूचा खेळ सुरू होता. अखेर, काही वेळ तिथेच विसावल्यानंतर बिबट्या स्वतःहून ट्रॉलीतून खाली उतरला आणि शेतात निघून गेला. बिबट्या नजरेआड होताच त्या तरुणाने सुटकेचा निःश्वास सोडला.

श्रीगोंदा तालुक्यात ऊस तोडणी झाल्यानंतर बिबट्यांचा वावर कमी होईल, असा अंदाज होता. मात्र, आता ऊस नसल्याने लपण्यासाठी जागा उरलेली नाही त्यामुळे बिबटे आता थेट मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. तांदळी दुमाला येथील या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरले असून, आज नशिबाने साथ दिली म्हणून जीव वाचला… पण वनविभागाची झोप कधी उडणार? शेतकऱ्याने शेतात राबायचं की, बिबट्याचं सावज बनायचं? हा प्रश्न आज संपूर्ण श्रीगोंदा विचारतोय.

Exit mobile version