Download App

‘माझ्यावर टीका करणाऱ्यांनी बांधावर जावे’; ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

  • Written By: Last Updated:

मुंबई : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोमवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासासह जोरदार अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीचे पिके (Rabi crops) भुईसपाट झाल्यानं पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. काढणीला आलेले पिकासह मोसंबी, डाळीब, द्राक्ष फळ बागा गळून पडल्या आहेत. आधीच पिकांना योग्य भाव नाहीत, त्यात अवकाळी पावसाने नुकसानं केल्यानं बळीराज हताश आहे. अवकाळी पावसाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यांनी आज विधानभवन पायऱ्यावंवर आंदोलन करत शेतकऱ्यांना तातडीन आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. तर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आता बांधावर जावे, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातील बहुतांश भागात काल परवा झालेल्या अवकाळी पावसानं दाणादाण उडवून दिली. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं. गहू, हरभरा, मका या पिकांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतला. गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता नुकसाग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून माजी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. माझ्यावर घरी बसण्याची टीका करणाऱ्यांनी आता बांधावर जावं, असा खोचक सल्ला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदे घेतली, त्यावेळी विरोधकांना हा टोला लगावला.

ते म्हणाले, अवकाळी विषय आता कालपरवाकडे झाले. पण, त्याच्या आधी कांद्याचे आंदोलन हे पेटलेलंच आहे. मग ते कुणाचं संकट आहे. म्हणून माझ्यावर जे टीका करत होते, की, ठाकरे हे घरी बसून कारभार करतात. हो, केला मी घरी बसून कारभार…. पण, आता तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर जा आणि निराश झालेल्या शेतकऱ्यांना एक दिलासा द्या. नाहीतर आम्ही आहोतच रस्त्यावर उतरायला, असा इशारा त्यांनी दिला.

UN मध्ये पाकिस्तानने काश्मीरबाबत पुन्हा सूर आवळला; भारताने फटकारत म्हटलं…

दरम्यान, राज्यात 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आणि सत्ताधारी पक्षातील नेते रंगाची उधळण करत बसले होते. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं होतं. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नेमकी काय मदत करते की, बळीराजाच्या तोंडाला फक्त पानं पुसते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us