Download App

Letsupp poll : संजय राऊत विरुद्ध नितेश राणे यांच्यातील सामना म्हणजे ‘मनोरंजन’

Letsupp poll : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात व्यस्त आहे. प्रामुख्याने पहिले तर दररोज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व भाजपचे आमदार नितेश राणे हे आरोप – प्रत्यारोप करताना दिसून येतात. दरम्यान या दोघांमध्ये रंगणारा सकाळचा सामाना कसा वाटतो याबाबत लेट्सअप मराठीने एक विशेष सर्वेक्षण केले. व सर्वेक्षणाच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार जनता या दोघांच्या होणाऱ्या सामन्याकडे मनोरंजन म्ह्णून पाहत असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच तब्बल 62 टक्के लोकांनी या सामन्याकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पहिले आहे तर पाठोपाठ 23 टक्के लोकांना यांची वक्तव्य म्हणजे थापा वाटत आहे.

संजय राऊत विरुद्ध नितेश राणे यांच्यातील रोज सकाळी होणारा सामना तुम्हाला कसा वाटतो? असा सवाल लेट्सअप पोल मध्ये विचारण्यात आला होता. गेल्या चोवीस तासात 25 हजार लोकांनी या प्रश्नावर आपले मत मांडत आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रामुख्याने 62 टक्के लोकांनी या दोघांच्या सामन्याला मनोरंजनाचे स्वरूप दिले आहे. म्हणजेच यांच्या दररोज होणाऱ्या सकाळच्या आरोप – प्रत्यारोप तसेच टीका टिप्पणी कडे मनोरंजन म्हणून पहिले जात असल्याचे मत लोकांनी नोंदवले आहे. तर 23 टक्के लोकांनी त्यांच्या या टीका टिप्पणीवर थापा मारणारे म्हणून आपले मत नोंदवले आहे.

1

दरम्यान या पोलवर अनेक युझर्सने भन्नाट कमेंट देखील केल्या आहे. यामध्ये काही युझर्स म्हणतात, आम्हाला गेल्या 3 वर्षापासून कंटाळा आला आहे. रोज तेच तेच आरोप प्रत्यारोप. लोकांचे प्रश्न बाजूला राहतात आणि हे पर्सनल वाद चव्हाटय़ावर आणतात. तर दुसरा युझर्स म्हणाला, दोघांनी पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला नेलेली आहे. तसेच अनेकांनी याकडे मनोरंजन म्हणून पहिले असल्याचे प्रतिक्रियांमधून स्पष्ट होत आहे.

2

तर काही युझर्स म्हणतायत, लोक नेते किती गलिच्छ भाषा बोलतात याच प्रतीक दिसून येत.मारामारी होणं बाकी आहे. त्यात कोण वरचढ होणार ते पाहतोय. तसेच काही युझर्सने माध्यमांसह दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. राऊत याना कुणी तरी बोलणारा पाहिजे होता,राने वस्ताद भेटले.!!मनोरंजक दोघे पण कार्टून आहेत, लोकांनी पाहुच नये, आपला बहुमूल्य वेळ घालवू नये, अशा भन्नाट कमेंट युझर्सने दिल्या आहेत.

Tags

follow us