Download App

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन, ‘CBTC’ यंत्रणेमुळे फायदा

लेटमार्कचं टेन्शन संपणार. मुंबईकर आता वेळेत कामावर पोहोचणार, सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल.

  • Written By: Last Updated:

Mumbai Local Train : लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुंबई उपनगर, ठाणे, अंबरनाथ, नवी मुंबई, बदलापूर परिसरातील बहुतांश चाकरमान्यांना आपले कार्यालय गाठण्यासाठी लोकल ट्रेनवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे मुंबईकरांचं आयुष्य लोकल ट्रेनच्या तालावर धावतं, असं म्हटल्यासही वावगं ठरणार नाही. (Mumbai Local) मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये लोकल ट्रेनचे कोलमडणारे वेळापत्रक, तांत्रिक बिघाड आणि त्यामुळे प्रवाशांवर तासनतास ताटकळत राहण्याची वेळ येणं, हे चित्र सामान्य झालं आहे. परंतु, लवकरच हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

लग्नानंतर प्रथमेशच पुनरागमन; मुंबई लोकलमध्ये या अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच एकत्र दिसणार

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेनसाठीच्या नव्या प्रणालीविषयी भाष्य केलं. रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करत तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचं अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे. अशाप्रकारची यंत्रणा लाभणारे मुंबई हे पहिलंच शहर ठरणार आहे. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल, असा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून करण्यात आला.

350 नव्या एसी लोकल

मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 350 नव्या एसी लोकल विकत घेण्यासंदर्भात रेल्वेकडून निविदा काढली जाणार आहे. मात्र, एसी ट्रेनला असणाऱ्या राजकीय विरोधामुळे ही प्रक्रिया थांबल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मात्र, एसी ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढत असल्याने उपनगरी रेल्वे मार्गावर एसी ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येईल.

IPO : नॉर्दर्न आर्क कॅपिटलचा IPO  उद्यापासून खुली; महत्वाची अपडेट वाचा एका क्लिकवर

आजचा मेगाब्लॉक रद्द

गणेशदर्शनानिमित्त रविवारी मुंबईत मोठ्याप्रमाणावर भाविक येणार असल्याने मध्य रेल्वेने आजचा मेन लाईनवरचा नियमित मेगाब्लॉक रद्द केला आहे. तथापि, हार्बर मार्गावर मात्र सकाळी 9.40 ते सायंकाळी 4.51 या वेळेत दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.

follow us