Lokmanya Tilak National Award To Nitin Gadkari : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची (Lokmanya Tilak National Award) घोषणा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना (Nitin Gadkari ) यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक हा 43 वा राष्ट्रीय पुरस्कार यंदाच्या वर्षी गडकरींना दिला जाणार आहे.
पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द! सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होणार?
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे असते. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतो. या सन्मानाची स्थापना 1983 साली करण्यात आली आणि तेव्हापासून देशपातळीवरील अनेक थोर व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पुरस्कार उल्लेखनीय कार्यासाठी
गेल्या चार दशकांत एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन.आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक आणि डॉ. सायरस पूनावाला यांसारख्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नराधमांची क्रूरता! महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 वार, गळा 20 सेमी खोल कापला, श्वसननलिका फाडली…
हा पुरस्कार देशसेवा, वैज्ञानिक संशोधन, औद्योगिक योगदान आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो, आणि त्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारांची प्रेरणा असते.