Download App

अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झाला त्यामुळे वैफल्य; राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार

आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Devendra Fadnavis : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही नवे खुलासे केले आहेत. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय. (Sanjay Raut) ते पत्रकारांशी बोलत होते. त्याचबरोबर राऊत यांनी आपल्या शैलित फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

उगाच नाक खुपसू नये

आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी नेमकं काय ठरवलं हे माझ्या इतकं कोणाला माहित नाही. सुरुवातीच्या चर्चा शरद पवार आणि माझ्यातच झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसू नये. त्यांना काहीच माहित नव्हतं, अशी तेट टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राजकारण शिवसेनेलाही येतं

प्रगत राज्यात दरी निर्माण होणं हे चिंताजनक, मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

आमचे सरकार बनत आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांना धक्का बसला होता, पडता पडता वाचले, कोसळले असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे त्यांना समजल्यावर त्यांना वाटलं होतं शिवसेना काय करणार? आमच्या पायाशी येणार, अशी त्यांची भूमिका होती. मात्र राजकारण शिवसेनेलाही येतं. आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून तुम्ही ते सरकार पाडलं. पाच वर्ष सरकार टिकावं अशी शरद पवार आणि आमची कमिटमेंट होती. त्यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालेले आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

फौजदाराचा शिपाई झाला

आम्ही जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला असता, तर तो आम्ही निश्चितपणे पाळला असता. पक्षाने त्यांच्यासमोरच घोषणा केली होती. प्रत्येक सभेत सांगितले होते. त्यानंतर जर ते बदलत असतील तर ते बरोबर नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता यावरून देखील संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस सध्या गोंधळलेलं व्यक्तिमत्व आहे. अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झाला त्यामुळे वैफल्य आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं एका गद्दारासाठी त्यांच्याच पक्षाने अध:पतन केलं असंही ते म्हणले.

follow us