Download App

लेट्सअप विश्लेषण : पवार-ठाकरेंची उमेदवार जाहीर करण्याची लगबग; कारणं नेमकी काय?

लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलं वाजणार आहे. या रणसंग्रामासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly election 2024 : लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलं वाजणार आहे. या रणसंग्रामासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात लोकसभेत मविआला चांगलं यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. सध्या मविआममध्ये विधानसभेसाठी जागा वाटपांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, असे असतानासुद्धा शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंनी त्यांचे उमेदवार जाहीर करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे जागा निश्चित झालेल्या नसताना ठाकरे-पवारांना उमेदवार जाहीर करण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागे नेमकी कारणं काय? याचाच घेतलेला हा आढावा.

भाजपची राजकीय कबर महाराष्ट्रात बांधा, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पेटवले

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावरुन इंडिया आघाडीत वाद सुरू आहे. दुसरीकडे मविआचे दोन बडे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. पवार आणि उद्धव यांनी आतापर्यंत 4 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत.विशेष म्हणजे ज्या जागांवर पवार आणि उद्धव यांनी उमेदवार जाहीर केले, त्या जागांवर मित्रपक्षांचेही दावेदारी आहे.

दोन जागांवर ठाकरेंनी दिला उमेदवार

शिवसेनेने (UBT) नाशिकच्या मध्य आणि पश्चिम जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. सध्या या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार आहेत.

2019 मध्ये नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे आणि नाशिक पश्चिममधून सीमा हेराई विजयी झाल्या होत्या. विशेष म्हणजे 2019 मध्ये शिवसेनेने या जागांवर उमेदवार उभे केले नव्हते. 2019 मध्ये भाजपचा नाशिक मध्यमध्ये काँग्रेस आणि नाशिक पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना झाला होता.

अब्दालीचा वंशज इथे येऊन बोंबलून गेला, उद्धव ठाकरेंची भाजपा नेते अमित शाहंवर घणाघाती टीका

विधानसभेसाठी पवारांनी मैदानात उतरवले दोन शिलेदार

एकीकडे ठाकरेंनी दोन जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलेली असताच दुसरीकड उमेदवारांची नावे जाहीर करण्यात शरद पवारही मागे नाहीयेत. ठाकरेंप्रमाणे पवारांनीही आतापर्यंत दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात पवारांनी तासगावमधून रोहित पाटील आणि अकोलेतून अमित भांगरे यांची नावे जाहीर केली आहेत.

तरूणांना पुढे आणण्याची हीच वेळ

एका कार्यक्रमात पवारांनी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांची नावे जाहीर केली. या दोघांच्या नावांची घोषणा करताना शरद पवार म्हणाले की, तरुणांना पुढे आणण्याची हीच वेळ आहे. त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे असे पवार म्हणाले होते.

शरद पवार करणार एका दगडात दोघांचा कार्यक्रम; इंदापूर विधानसभेमध्ये प्रवीण मानें ठरणार गेम चेंजर

तासगाव अकोले सध्या अजितदादांकडे

पवारांनी दोन जागांवर जाहीर केलेल्या तासगाव आणि अकोले या जागा सध्या अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत. तासगाव सांगली लोकसभा मतदारसंघात, तर अकोले ही शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे.

काँग्रेसची चुप्पी तर, नेत्यांचा विरोध

एकीकडे ठाकरे पवार उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत तर, दुसरीकडे या सर्व घडामोडींमध्ये मात्र, मविआचा घटक पक्ष असलेला काँग्रेस मात्र याबाबत मौन बाळगून आहे. मात्र, छोटय़ा नेत्यांनी या उमेदवारी जाहीर करण्याला विरोध दर्शवला आहे.
नाशिक मध्यमधून निवडणूक लढवलेल्या हेमलता पाटील यांनी उद्धव यांच्या निर्णयाला विरोध करत येथून केवळ काँग्रेसच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.

अजितदादा अन् शिंदेचं भाजप काय करणार? रोहित पवारांचं खळबळजनक भाकित..

जागा निश्चितीपूर्वी नावे जाहीर करण्याची दोन कारणे

जागा वाटपाच्या निश्चितीपूर्वीच ठाकरे आणि पवारांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यावरून राजकीय वातवरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, असे करण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या या रणनीतीकडे दबावाचे राजकारण म्हणून पाहिले जात आहे. महाराष्ट्रात अनेक बैठका होऊनही इंडिया आघाडीतील जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यात काँग्रेस सर्वाधिक 120 जागांवर दावा करत आहे.

तू राहशील किंवा मी राहिलवर ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले मी ढेकणांना आव्हान देत नाही

तर, दुसरं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने 21 जागांवर नावे जाहीर केली होती. काँग्रेसने दावा केलेल्या त्या जागांवर (सांगली, मुंबई दक्षिण मध्य) शिवसेनेनेही उमेदवार उभे केले होते. शिवसेनेची ही रणनीती लोकसभा निवडणुकीत यशस्वी ठरली होती. त्यामुळेच लोकसभेसारखाच फॉर्मुला ठाकरे आणि पवार विधानसभेलाही खेळू पाहत आहेत. त्यातूनच जागा निश्चितीपूर्वीच हे दोनेही नेते उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेत असल्याचे बोलले जात आहे.

follow us