Download App

मोठी बातमी : विधानसभेसाठी ‘राज’ खेळी, मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे देणार मोठा धक्का

लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही.

  • Written By: Last Updated:

मुंबई : लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. राज्यातही महायुतीचा करिष्मा पाहिजे तसा चालला नाही. उलट बॅकफूटवर गेलेली मविआने राज्यात महायुतीपेक्षा अधिक जागा मिळवत मुसंडी मारली. या धक्कादायक निकालानंतर आता मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आगामी काळातील विधानसभांसाठी मोठी रणनीती आखली असून, मनसेने विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर, 200 ते 250 जागांवर मनसेने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही. आपण 200 ते 250 विधानसभेच्या जागांवर लढण्याची तयारी करतोय, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे नांदगावकर म्हणाले.

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव कसं फिक्स झालं?; भुजबळांनी आतली बातमी फोडली

उद्धव ठाकरेंना मिळालेली मते मराठी माणसांची नाही

बैठकीत राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या कामगिरीवरही टिप्पणी केली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. मतदारांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग असून, ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकारी यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं आहे.

बीडमध्येच शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक; संभाजीराजेंकडून कृषिमंत्री धनंजय मुंडे टार्गेट

बैठकीत काय ठरले?

बाळा नांदगावकर म्हणाले की,  आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकारी यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आता पदाधिकारी कामाला लागणार आहेत. जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे जागांवर आम्ही तयारी करत आहोत. उपमुख्यमंत्री यांनी कोकण पदवीधर मतदार संघामध्ये विनंती केल्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचेही नांदगावकांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघांमध्ये आमच्या टीम जाणार आहेत आणि आढावा घेतला जाणार आहे.

मोठी बातमी : अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंपाच्या हालचाली; अंधारेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात हादरा

एक महिन्याने संपूर्ण राज्यातला मतदारसंघ आणि आढावा घेतल्यानंतर पुन्हा बैठक होणार आहे. पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघनिहाय माहिती मागवतील ती लवकरात लवकर द्यावी  पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न कराने अशी सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच युती आघाडी याबाबत लक्ष देऊ नका, असेही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

follow us

वेब स्टोरीज