अजितदादा तुमच्याच सरकारचे मंत्री, त्यांना भेटला का? पडळकरांनी स्पष्टच सांगून टाकलं

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे.  पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर […]

Ajit Pawar And Gopichand Padalkar

Ajit Pawar And Gopichand Padalkar

Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे.  पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर टीका केली त्याच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घ्यावी लागणार आहे. याच मुद्द्यावर आ. पडळकर यांनी आज भाष्य केले.

लेट्सअप मराठी प्रतिनिधीने आज विधीमंडळाच्या आवारात आमदार पडळकर यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत आल्यानंतर काय वाटतं? मंत्रीपद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता आता कमी झाली का? तसेच कामानिमित्त कधी अजित पवार किंवा राष्ट्रवादीतील अन्य मंत्र्यांशी भेटणं झालं का?, या प्रश्नांवर पडळकर यांनी स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली.

‘अजित पवार यांचं ‘ते’ वक्तव्य अत्यंत वाईट’; उद्धव ठाकरेंनी अजितदादांना पहिल्यांदाच सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपसोबत आल्यानंतर काय वाटतं असा प्रश्न विचारला असता पडळकर म्हणाले, ‘आमच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय विचारपूर्वकच घेतला आहे. आज भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची त्यांनी भूमिका घेतली असेल जे कधीकाळी टोकाचा विरोध करत होते. मोदींना टोकाचा विरोध करत होते. ती लोकं जर आज भाजपाच्या विचाराबरोर काम करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे.’

आम्ही मंत्रीपदाचा कधीच विचार करत नाही

या घडामोडींमुळे मंत्रिपदासाठी किंवा महामंडळासाठी वेट अँड वॉच करावं लागत आहे का?, या प्रश्नाचे उत्तर देताना पडळकर म्हणाले, ‘असं काहीच नाही. आता अडीच वर्षे आमची सत्ता नव्हती. तरी आमच्या 105 आमदारांपैकी कुणी फुटला? कुणी स्टेटमेंट केलं? कुणी काही नाराजी दाखवली? एक साधा नगरसेवक तरी फुटला का?, भाजपाचा कार्यकर्ता सत्ता असली किंवा नसली तरी त्याचा त्याला काहीच फरक पडत नाही. सत्ता नव्हती तरी आमचे लोक काम करत होते. कोविड काळात ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री फिरत नव्हते त्यावेळीही आमचे लोक काम करतच होते. त्यामुळे मंत्रीपद किंवा महामंडळाचे पद असले काय नसले काय आमची माणसं काम करतच राहतात’, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला

मी अजून अजितदादांना भेटलोच नाही

अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याकडे काही कामानिमित्त जाणं झालं का? या प्रश्नावरही पडळकर यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ‘मी अजून कुणाकडेच गेलेलो नाही’, असे पडळकर म्हणाले.

Exit mobile version