Maharashtra Band : आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन महाविकास आघाडीने केलं आहे. (Maharashtra Band) कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आज काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहे. बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले. त्यानंतरही हायकोर्टानंही कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं म्हटलं आहे.
अत्याचाराची जबाबदारी याचिकाकर्ते, न्यायालय घेणार का ? बंद मागे घेतो पण उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
उच्च न्यायालयाने बंदला परवानगी नाकारल्यानंतर आजचा नियोजित ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यात येत असल्याचं महाविकास आघाडीच्या वतीने काल जाहीर करण्यात आलं. मात्र, बदलापूरमधील विकृत घटनेवरून राज्य सरकारला घेरण्यासाठी राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास पुरेसा वेळ नसल्यानेच बंद मागे घेण्यात येत असल्याचं राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि, उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून नियोजित बंद मागे घ्यावा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. उच्च न्यायालयाने बंद मागे घेण्याच्या आदेशात जी तत्परता दाखवली तशीच तत्परता बदलापूरमधील नराधमाला शिक्षा देण्यात दाखवावी, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
मोठी बातमी : संविधानाचा आदर राखून उद्याचा; महाराष्ट्र बंद मागे घ्या; शरद पवारांचे आवाहन
आजचा बंद विकृती विरोधात होता. उच्च न्यालयाने तत्परतेने बंदला विरोध केला आहे, त्यामुळे बंद मागं घेत आहोत. मात्र महाविकास आघाडी चे नेते चौका चौकात काळे झेंड, काळ्या फिती लावून निदर्शने करतील. फ्रीडम ऑफ स्पीच आहे की नाही या बाबत घटना तज्ज्ञांनी बोलायला हवे. उच्च न्यायालाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. परंतु, आदर ठेवून उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहेत