Download App

Saroj Patil : पवारांच्या बहिणीने सांगितलं बारामतीचं तख्त कोण जिंकणार!

Baramati Lok Sabha Election : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत. या सगळ्यात बारामती मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तरीदेखील सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळेल असे निश्चित आहे. यानंतर आता या निवडणुकीत कोण विजयी होईल याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. एकूणच बारामती मतदारसंघातील या राजकारणावर खासदार शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील (Saroj Patil) यांनी भाष्य केले आहे.

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोण जिंकणार? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर सरोजताई पाटील म्हणाल्या, आमच्या विरोधकांना सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचाच आहे. सुनेत्रा पवारांना विजयी करायचं म्हणजे शरद पवारांचा पराभव झाल्यासारखंच आहे असं त्यांना वाटतं. पण, बारामतीतलं लोकांचं प्रेम, बारामतीत त्यांनी केलेली कामं. अजित पवारही काम करतात पण हा भक्कम पाया कुणी घातला? असा सवाल त्यांनी केला.

मनसेचा खरा फायदा श्रीकांत शिंदेंना होणार? ठाकरेंना सोबत घेऊन CM शिंदे मुलालाही करणार सेफ

जेव्हा शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण घरी आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, की शरद ही मतं तुझी नाहीत. ही मतं तुझ्या आई वडिलांची आहेत कारण हा सामाजिक पाया त्यांनी घातलेला आहे. इथून पुढं तू तुझी मतं मिळव. त्यानंतर शरद पवारांनीही प्रचंड काम केलं. त्यामुळे शरद पवार कधीच पडणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे, सुनेत्रा पवार यांना तिकीट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा स्वभाव प्रेमळ आहे. पण, सुप्रिया सुळे यांचा अभ्यास प्रचंड आहे. आपण मोठ्या नेत्याची मुलगी आहोत याचा जराही गर्व सुप्रियामध्ये नाही. संसदरत्न हा पुरस्कारही सुप्रिया सुळेंना मिळाला आहे. प्रश्न इतकाच आहे की तितकं काम सुनेत्रा पवारांचं नाही, असे सरोज पाटील म्हणाल्या.

आमचं कुटुंब फुटणार नाही

एनडी पाटील वेगळ्या पक्षाचे होते. शरद पवार वेगळ्या विचारसरणीचे होते. त्यांचा पक्षही वेगळा होता. शरद पवार काँग्रेसचे तर आई-वडील शेतकरी कामगार पक्षाचे होते. तेव्हा तर कुटुंब फुटलं का? आमच्या घरात विचार स्वातंत्र्य आहे. त्यामुळे लोकांना जे वाटतंय की कुटुंब फुटेल तर कुटुंब आजिबात फुटणार नाही. लोकं मात्र विचार करून मतं देतील असं मला वाटतं.

 

follow us