Download App

भाजप-काँग्रेसचा गळ्यात गळा ! ‘या’ निवडणुकीत भाजपने केली चक्क काँग्रेसशी युती

Amravati : बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका देणारी घटना घडली आहे. ज्या भाजपने देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा विडाच उचलला आहे त्याच भाजपने चक्क काँग्रेसला बळ देणारे काम केले आहे. एरव्ही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे हाडवैरी. दोघांत विस्तवही जात नाही. नेते तर एकमेकांवर अगदी खालच्या भाषेत टीका करतात. मात्र, अमरावतीत बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी गळ्यात गळे घातले आहेत. होय, अमरावती जिल्ह्यातील वरुड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसबरोबर युती झाली आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनीच ही युती घडवून आणली आहे.

येथे काँग्रेसच्या नरेशचंद्र ठाकरे यांच्या बाजूने त लढणार आहेत. बोंडे काँग्रेसवर नेहमीच तोंडसुख घेत असतात. महाविकास आघाडी ही अभद्र युती असल्याचे सांगत असतात. मात्र, त्याच अनिल बोंडेंच्या पुढाकाराने भाजप आणि काँग्रेस युती झाली आहे.

Eknath Shinde ; ‘…तर अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’

बाजार समिती निवडणुकींत बोंडे यांनी काँग्रेसच्या एका गटाबरोबर हातमिळवणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे अमरावतीतील राजकारण ढवळून निघाले आहे.

नेमकं काय घडलं ?

वरुड बाजार समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. मागील दहा वर्षांपासून तर येथे काँग्रेसचीच सत्ता होती. त्याआधी समितीतड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हर्षवर्धन देशमुख गटाचीही सत्ता होती. काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांचीही दहा वर्षे सत्ता होती.

बाजार समितीच्या 18 संचालकपदासाठी 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण 54 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विभागला आहे तर भाजपलाही गटबाजीची लागण झाली आहे. काँग्रेसच्या नरेशचंद्र ठाकरे गटाबरोबर काँग्रेसने युती केली आहे. तर काँग्रेसमधीलच गिरीश कराळे यांच्या दुसऱ्या गटाने राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुख गटाशी युती केली आहे.

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुठेही आघाडी झाली नाही असे म्हटले होते.  आता काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर नसली तर भाजपशी मात्र हातमिळवणी केली आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात निश्चितच उमटणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष या युतीमुळे नाराज दिसत आहेत. त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

 

Tags

follow us