Ashish Shelar questioned Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अन्य नेते सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. निवडणुका जवळ येत आहेत तसे हे राजकारण आणखी पेटताना दिसत आहे. याच दरम्यान आता भाजपने (BJP) पलटवार करत उद्धव ठाकरेंनी डिवचलं आहे. भाजप नेते अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत ठाकरे गटाला टोचणारे सवाल उपस्थित करत त्यांची उत्तरे देण्याचे आव्हान दिले आहे.
शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लावून उबाठाला थेट विचारतोय.. औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?, उस्मानाबाद की धाराशिव?, अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? काँग्रेस की हिंदुत्व?, कबर की स्मारक? आणि औरंगजेब की सावरकर? म्हणून शब्दांची कोटी न करता.. मर्द, खंजीर.. असले शब्द न वापरता.. उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दांत सांगावे.. यापैकी नेमके काय? की दोन्ही ? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल गाणी.. असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.
महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय…
◆ औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?
◆ उस्मानाबाद की धाराशिव?
◆ अहमदनगर की पुण्यश्लोक
अहिल्यानगर?
◆ काँग्रेस की हिंदुत्व?
◆ कबर की स्मारक?
आणि
◆ औरंगजेब की सावरकर?
म्हणून
शब्दांची कोटी न करता..
मर्द,…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 23, 2023
दरम्यान, मुंबई महापालिकेवरून भाजप आणि ठाकरे गटात युद्ध सुरू आहे. मुंबईला माय बाप राहिले नाहीत. लुटालूट सुरू आहे. या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी 1 जुलै रोजी शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करणार आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकारण सध्या तापले आहे.
दोन दिवसांपूर्वी ईडीने ठाकरेंच्या निकटवर्तियांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या कारवाईमुळेही ठाकरे गट खवळून उठला आहे. कोविड काळातील घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तियांची चौकशीही करण्यात आली आहे. यावरून वाद चांगलाच वाढला आहे. आता यावर ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेत मोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात ठाकरे गट आणि भाजपातील आरोप प्रत्यारोपांचे राजकारण वाढत जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.