दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज दुपारी एक वाजता दहावीच्या बोर्डाचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकही या निकालाची वाट बघत आहेत. २ मार्च ते २५ मार्च या तारखांदरम्यान दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी एकुण १५ लाख ७७ हजार विद्यार्थी बसले होते.
विद्यार्थ्यांना ‘www.mahresult.nic.in’ या वेबसाईटवर आपला रिजल्ट पाहता येणार आहे. राज्यात पाच हजार ३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर होणार आहे.
जर विद्यार्थ्यांना पेपर रिचेकींगसाठी पाठवायचा असेल तर ‘http://verification.mh-ssc.ac.in’ या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थी ते करु शकतात. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
मोठी बातमी : विठू नामाचा गजर गगनात निनादणार; चोख नियोजनाबरोबर टोल माफीचे निर्देश
राज्य मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये आठ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी आणि सात लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनी आहेत. एकूण २३ हजार १० माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.