Download App

Maharashtra Budget 2023 : शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने मदत; फडणवीसांची घोषणा

Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प पाच अमृतकाळावर आधारित असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठ्या घोषणा केल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत केली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात दिली जाणार असून, प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये दिले जाणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.  याशिवाय शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना निवारा-भोजन दिले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सुविधा देण्याबरोबरच, शेतकर्‍यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारले जाणार असून, जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना केली जाणार असून, आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ केली जाणार आहे. विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 160 कोटी रुपयांची तरतुद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून, अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे.

Tags

follow us