मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार असून महामंडळामार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आव्हाडांनी टाळले पण, रोहित पवार बोललेच; नागालँडमधील भाजप मैत्रीवरून केले सूचक वक्तव्य
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने नूकसानग्रस्त शेतकऱ्यांसह धनगर बांधवाना दिलासादायक घोषणा केल्या आहेत. यामध्ये विशेषत: 22 योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून या योजनांची राज्य मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समीतीमार्फत अमंलबजावणी करण्यात येणार आहे.
या सहकार विकास महामंडळाचं मुख्यालय अहमदनगर जिल्ह्यात असणार आहे. त्यासोबतच राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधीचीही तरतूद करण्यात आली आहे.
Satish Kaushik : तेव्हा सतिश कौशिक यांनी गर्भवती अभिनेत्रीला घातली होती लग्नाची मागणी
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या आठवडा सुरु आहे. आज राज्य सरकारकडून 2023-24 सालचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करीत आहेत.
राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊसाने मोठ्या अर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांसाठीही राज्य सरकारकडून मोठी अर्थिक तदतूद करण्यात आलीय.
बॉर्डर गावस्करचा अखेरचा सामना खास, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची उपस्थिती
यामध्ये विशेषत: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. तसेच शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार असून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेवर 1 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
यासोबतच इतरही घटकांसाठी राज्य सरकारडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.