Download App

Live Blog : चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयी

  • Written By: Last Updated:

Pune Bypoll Results : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. कसब्यात काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी निवडून आले आहेत.

दरम्यान चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या अजूनही आघाडीवर आहेत. शेवटच्या काही फेऱ्या मोजण्याचे शिल्लक आहे. पुढील काही वेळात तेथील निकाल स्पष्ट होईल.

LIVE NEWS & UPDATES

  • 02 Mar 2023 04:20 PM (IST)

    ‘चिंचवडही जिंकलं असतं पण…’ ‘राहुल कलाटेंवर अजित पवार म्हणाले

    महाविकास आघाडीने ही जागा जिंकून राज्याला एक वेगळा मेसेज दिला आहे. असंच चिंचवडलाही घडली असती पण तिथे राहुल लकाटे यांच्यामुळे तेथे मतविभागणी झाली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला. त्यांना भाजप शिंदेंनीही सहकार्य केलं. पण त्यामुळे आमचा पराभव झाला असं नाही दोन्ही जागा भाजपच्या आणि सहानुभूती होती. पण या ऐवजी महागाई, बेरोजगारी आणि शिवसेनेचं चिन्ह काढून घेतल्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली ते कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयानंतर बोलत होते.

    सविस्तर वाचा 

    Kasba By Election : ‘चिंचवडही जिंकलं असतं पण…’ ‘राहुल कलाटेंवर अजित पवार म्हणाले

  • 02 Mar 2023 04:18 PM (IST)

    रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

    पुणे : कसबा पेठ मतदार संघात (Kasba Bypoll) भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच या मतदार संघाकडेच सलग चार वर्षे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. या पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना निवडून आणण्यासाठी या १६ नगरसेवकांना काम करण्याचे आदेश दिले होते. तसेच जर हेमंत रासने निवडून आले नाही तर येणाऱ्या महापालिकेत तुम्हाला नगरसेवकाचे तिकीट मिळणार नाही, असा एकप्रकारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दमच दिला होता.

    सविस्तर बातमी वाचा

    Kasba Bypoll रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

  • 02 Mar 2023 04:08 PM (IST)

    Ravindra Dhangelkar : धंगेकरांनी उधळला गुलाल, कार्यकर्ते म्हणतात...

  • 02 Mar 2023 04:07 PM (IST)

    चिंचवडच्या अखेरच्या सात फेऱ्यांमध्ये उलटफेर होणार का? धाकधूक वाढली

    LIVE : चिंचवडच्या अखेरच्या सात फेऱ्यांमध्ये उलटफेर होणार का? धाकधूक वाढली.

    लेट्सअपचे प्रतिनिधी विष्णू सानप यांनी घेतलेला आढावा

  • 02 Mar 2023 04:04 PM (IST)

    फडणवीस आणि शिंदेंना जनतेने सपशेल नाकारले - जयंत पाटील

    ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडण्याच काम झालं, शिंदे-फडणवीस सरकारने ज्या काही राजकीय संस्कृतीला बाधक ठरणाऱ्या गोष्टी केल्या. त्याचा विरोध जनतेने केला. मतदारांनी रासने यांना धोबीपछाड करून धंगेकरांना मतदारांनी विजयाचा कौल दिला, यावरुन मतदार शिंदे-फडणवीस यांच्या कसब्यातील कामाविषयी नाराज असल्याचं दिसतं असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

    सविस्तर वाचा

    ‘फडणवीस आणि शिंदेंना जनतेने सपशेल नाकारले’; कसब्यातील विजयानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल

  • 02 Mar 2023 04:03 PM (IST)

    `Pune BJP म्हणजे मोहोळ, मुळीक, बीडकर आणि रासने हे काही योग्य नाही`

    कसब्यात केवळ भाजपाचे हेमंत रासने यांचा पराभव झालेला नाही तर कोल्हापुरात ज्यांना फारसे काही जमले नाही आणि राज्यात सत्ता उपभोगूनही ज्यांना आपल्या जिल्ह्यात स्वतःचा मतदारसंघ तयार करता आला नाही, त्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा मोठा पराभव आहे. खरंतर त्यांनी हा पराभव झाल्यावर पुण्याचे पालकमंत्रीपद सोडून द्यायला हवे. पण ते तसे करणार नाहीत.

    भाजपच्या या पराभवाचे विश्लेषण करणारा लेख मुक्त पत्रकार विश्वनाथ गरुड यांचा लेख

    सविस्तर वाचा

    Election Results 2023 Live : नागालॅंड भाजपपुढे पण मेघालयमध्ये एनपीपी ठरणार मोठा पक्ष

  • 02 Mar 2023 04:00 PM (IST)

    तिसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर

    तिसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर

    मिळालेली एकूण मते

    आश्विनी जगताप - 112113
    नाना काटे - 84384
    राहुल कलाटे - 38900

    आश्विनी जगताप 27729 मतांनी आघाडीवर

  • 02 Mar 2023 03:55 PM (IST)

    अठ्ठावीसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर

    अठ्ठावीसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर

    मिळालेली एकूण मते

    आश्विनी जगताप - 105138
    नाना काटे - 81831
    राहुल कलाटे - 32178

    आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर

  • 02 Mar 2023 03:22 PM (IST)

    आश्विनी जगताप 17,578 मतांनी आघाडीवर

    सव्वीसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांचं लीड जोरदार वाढलं

    मिळालेली एकूण मते

    आश्विनी जगताप - 96431
    नाना काटे - 78853
    राहुल कलाटे - 29624

    आश्विनी जगताप 17,578 मतांनी आघाडीवर
    #electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi
    #kasaba #KasabaPeth #ChinchwadByPoll

Tags

follow us