Winter : राज्यात हुडहुडी वाढणार! उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्यात कडाक्याची थंडी…

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह होत असल्याने राज्यातील अनेक भागांत पुढील दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलायं.

Untitle (20)

Untitle (20)

Winter : मागील काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याचं दिसून येत आहे. उत्तरेच्या थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरु असल्याने राज्यातील दिवसागणिक थंडीची (Winter) लाट येत आहे. राज्यात पहाटे धुक्याची चादर पसरत असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामा विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आणखीन हुडहुडी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सावधगिरीचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील दौऱ्यात दानवे माणसं शोधत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

सध्या राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला असून कमाल तापमानात घट होत आहे. तर पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशिरापर्यंत टिकत आहे. काल रविवारी डाहाणू आणि रत्नागिरीमध्ये 34.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

BCCI ची मोठी घोषणा, मिनी लिलावाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी 10 संघ खर्च करणार तब्बल 237.55 कोटी

रविवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी आठ अंश तापमान नोंदले गेले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ८.५ अंश तापमानाची नोंद झाली. जेऊर, गोंदिया आणि भंडारा येथे दहा अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाल्याने थंडीची लाट होती. जळगाव, मालेगाव, नाशिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे पारा अकरा अंशांच्या खाली असल्याने हुडहुडी कायम आहे.

लंडनच्या रोमान्समध्ये गुंफलेली मराठी कहाणी, आसा मी अशी मी’ चा पोस्टर लाँच! ‘या’ दिवशी भेटीला येणार चित्रपट

पुण्यात थंडीचा कडाका वाढला…
गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Exit mobile version