Download App

पटोलेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावले; सभेसाठी दिले कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. सभेला व आंदोलनाला गर्दी होत नसल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. एका ऑनलाईन मिटींगमध्ये नाना पटोले यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन त्यांनी पदाधिकाऱ्यांना चागंलेच धारेवर धरले आहे.

राज्यभरामध्ये काँग्रेसच्या सभांना, आंदोलनाला व कार्यक्रमांना अपेक्षित गर्दी होत नसल्याे नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला असून अशा प्रकारची दिरंगाई अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सभेला होणारी कमी गर्दी हे सकारात्मक चित्र नसल्याचे पटोले म्हणाले आहेत.

मोठी बातमी : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

26 तारखेला काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नाना पटोले यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. पक्षाचे मोर्चे, आंदोलन, सभा यांना गर्दी होत नसल्याच्या कारणावरुन त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. पुढच्या काळात कोणत्या कार्यकर्त्याने किती लोक आणले याचा लेखाजोखा पक्ष ठेवेल व त्यानुसार पदे दिली जातील असे पटोले म्हणाले आहेत.

Girish Bapat : नगरसेवक, २५ वर्षे आमदार ते खासदार, गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

यासंदर्भात नाना पटोले यांनी एक पत्र जारी केले असून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला ते पत्र दिले आहे. तसेच त्यांनी प्रत्येकाने किती कार्यकर्ते आणायचे याचे टार्गेट देखील दिले आहे. प्रदेश पदाधिकाऱ्याने 40 कार्यर्ते आणले पाहिजे. जिल्हा पदाधिकाऱ्याने 20 कार्यकर्ते आणले पाहिजे, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Tags

follow us