Download App

‘145 आमदार असतील तर त्यांनी’.. अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचा टोला

Nana Patole : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला होता. 2024 मधील निवडणुकीनंतर माझी मुख्यमंत्री पदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल असे पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पटोलेंनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,अजित पवार यांच्याकडे जर 145 आमदार असतील तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे. सारखं मी मुख्यमंत्री बनतो, असं म्हणण्याची गरज नाही. राज्यात आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

याआधी काही दिवसांपूर्वी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांना पूर्णविराम देत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तिसऱ्या दिवशी पुन्हा ते पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे माध्यमांनाही यातलं किती माहिती आहे हे त्यांनाच माहिती असे पटोले म्हणाले.

हा ज्याचा-त्याचा प्रश्न

काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीची माध्यमांत मोठी चर्चा झाली होती. या भेटीवर आज पटोले यांनी भाष्य केले. पटोले म्हणाले, कोण कोणाला भेटतं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र, आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहोत.

धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…

अजितदादांनी शपथ घ्यायलाच नको होती 

अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले की 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार होते. तरी देखील पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावर पटोले म्हणाले, त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घ्यायला नको होती. उपमुख्यमंत्री पदावर बसून खदखद करण्यापेक्षा बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती, असे पटोले म्हणाले.

Tags

follow us