Corona Vaccination : आजपासून ‘या’ वयोगटाला दिली जाणार देशातील पहिली कोविड नेजल व्हॅक्सिन

Maharashtra Corona Vaccination by nasal Vaccine iNCOVACC : गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क […]

Nezal Vaccine

Nezal Vaccine

Maharashtra Corona Vaccination by nasal Vaccine iNCOVACC : गेले अनेक महिने देश आणि राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असताना आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहे. तर काही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि मास्क सक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 8 राज्यांना विशेष लक्ष ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना खबरदारीचे उपाय म्हणून कारवाई करण्याबाबतही निर्देश दिलेत.

Market Committee Election : राज्यभरात बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पाणाला

त्यानंतर आता सरकारने पुन्हा एकादा लसीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये आता राज्या सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता देशातील पहिली नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना लस आजपासून देण्यात येणार आहे. नेजल व्हॅक्सिन iNCOVACC देण्यात येणार आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. ज्या नागरिकांनी कोविशिल्ड किंवा को व्हॅक्सिन या लस घेऊन सहा महिने झाले आहेत त्या नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.

Exit mobile version