Download App

Devendra Fadnavis : धमक्या देण्याचे प्रकार खपवून घेणार नाही; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत ट्विट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले, राजकीय पातळीवर मतभेद असतील पण मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी येणं खपवून घेणार नाही. कायद्याप्रमाणे पोलीस निश्चित कारवाई करतील. सभ्यतेच्या मर्यादा पार करणे खपवून घेणार नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी सुळेंनी केली. 2 ट्विटर हॅंडेलवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळेंनी केली.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला व्हॉट्सअॅपवरुन हा एक मेसेज आला. कोणत्या तरी एक वेबासाइटवरुन धमकी देण्यात येत आहे. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या कमेंट यावर करत आहे, असे त्या म्हणाल्या. तुमचाही दाभोलकर होणार, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.

.. तर गृह विभागाची जबाबदारी राहणार

जर काही झालं तर त्याला फक्त देशाचं व राज्याचं गृहखातं जबाबदार असेल असे सुळे म्हणाल्या. काही बरंवाईट झालं तर केंद्रीय गृहखातं जबाबदार असेल, असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना इशारा दिला. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. महिला व मुलींच्याबाबतीत अधिकच धोकादायक स्थिती झाली आहे. त्यामुळे अमित शाहांना माझी विनंती आहे की, त्यांनी तात्काळ राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा.

मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

 

Tags

follow us