मोठी बातमी! महाराष्ट्रात दुष्काळ, केंद्रानेही घेतली दखल; पथक पाहणीसाठी कधी येणार?

महाराष्ट्रात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यांत केंद्राचे पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आलीयं.

Shivrajsingh Chouhan

Shivrajsingh Chouhan

Drought : राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारनेही दुष्काळाची गांभीर्याने दखल घेतली आहे. पुढील महिन्यात केंद्राचे पथक महाराष्ट्रात दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारसह केंद्र सरकारकडूनही मोठी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्राच्या मदतीमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शरद पवारांची मोठी एन्ट्री; सरकारच्या घोषणांनंतर बैठकीत घेतला मोठा निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी मंत्र्यांनी दुष्काळाची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारकडून राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारकडूनही जोरदार हालचाली सुरु असून केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. दिल्लीतील पुसा येथील राष्ट्रीय कृषी संमेलनात ते रब्बी अभइयान 2026 च्या उद्घाटनाला येणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी केंद्राचे पथक राज्यात येणार असल्याची माहिती समोर आलीयं.

कोपर्डी प्रकरणात मोठी घडामोड; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घटनास्थळाची करणार प्रत्यक्ष पाहणी

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पीक नियोजन हे उपलब्ध पाण्याचा ताळेबंद, जमिनीतील ओलावा आणि सिंचनाची उपलब्धता लक्षात घेऊन करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री चौहान यांनी केले. पाणीटंचाई असलेल्या भागात कमी पाण्यात येणाऱ्या कडधान्ये आणि तेलबिया पिकांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. धान कापणीनंतर रिकाम्या राहणाऱ्या क्षेत्रात हरभरा, मसूर आणि मोहरीसारख्या पिकांची लागवड वाढविण्यावर भर देण्यात आला.

Exit mobile version