Download App

राज्यात डोळ्यांचा संसर्ग वाढला! बुलढाण्यासह पुण्यात सर्वाधिक रुग्ण…

Conjunctivitis Eye Infection : काही दिवसांपासून राज्यात डोळ्यांच्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यात 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यांत आत्तापर्यंत 44 हजार 398 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुण्यातही 30 हजार 63 रुग्ण आढळून आले आहेत. डोळ्यांचा संसर्ग झाल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

चांद्रयान 3 ने पाठवला पहिला Video; ‘ऑर्बिट रिडक्शन’ प्रक्रिया यशस्वी

राज्यातील ज्या भागांत डोळे येणाच्या साथीचा प्रसार वाढतोयं त्या भागातल्या दारोदारी जाऊन नागरिकांच सर्वेक्षण करण्याचं काम सुरु आहे. सर्व जिल्ह्यांत आरोग्य शिक्षणासंदर्भात प्रोटोपाईप तयार करुन देण्यातं आलं आहे. त्याचबरोबर शाळकरी मुलांचीदेखील तपासणी करुन त्यांना उपचार देण्यात येत आहेत. त्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आहेत.

हे होणार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान, भारतात होते उपउच्चायुक्त

राज्यात सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातं आढळून आले असून तिथल्या रुग्णांची 44 हजार 398 वर पोहचली आहे. तर पुण्यात 30 हजार 63, जळगाव 24 हजार 654, नांदेड 22 हजार 860, चंद्रपूर 16 हजार 799, अमरावती 16 हजार 68, परभणी 16 हजार 5, अकोला 14 हजार 270, धुळे 13 हजार 398, वर्धा 12 हजार 88, नंदुरबार 11 हजार 405, भंडारा 10 हजार 54, वाशिम 9 हजार 542, इतके रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, डोळे लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळयाना सूज येणे, डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ येणे, डोळ्याला खाज येते, डोळे जड वाटणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. डोळे आल्यानंतर नागरिकांनी डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे, इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये, डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. घराबाहेर जाताना गॉगल वापरा, संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, अशी काळजी घ्यावी.

Tags

follow us