राज्यात FDA ची धडक कारवाई! 6,495 किलो अन्नसाठा जप्त; किंमत तब्बल 24.92 लाख रुपये

Maharashtra FDA Action Tukaram Mundhe; अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली.

Maharashtra FDA Action Tukaram Mundhe

Maharashtra FDA Action Tukaram Mundhe

Maharashtra FDA Action Tukaram Mundhe: राज्यभरात अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम राबवली. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वात या कारवाई करण्यात आल्या. या कारवाईत विविध प्रकारचा 6,495 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत 24 लाख 92 हजार 455 रुपये आहे. 27 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, कोकण, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत ही तपासणी करण्यात आली.

अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती द्या; जय पवारांची CID अधिकाऱ्यांकडे मागणी

या मोहिमेदरम्यान संशयास्पद गुणवत्ता, लेबलवरील त्रुटी, आवश्यक परवाना किंवा नोंदणीचा अभाव आणि अन्नपदार्थांच्या मानकांबाबत शंका असलेल्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली. नागपूर विभागातील कामठी येथील एका खाद्यपदार्थ उत्पादकाकडून सर्वाधिक 1,795 किलो सोनपापडी जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत 10 लाख 60 हजार 970 रुपये आहे.

नागपुरात 1,795 किलो सोनपापडी जप्त

नागपूर विभागातील कामठी येथील मे. राधेकृष्ण फूड प्रॉडक्ट्स या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचे तसेच उत्पादनांच्या लेबलवरील घोषणांमध्ये त्रुटी असल्याचे आढळले. त्यानंतर प्रशासनाने 1,795 किलो ममता सोनपापडीचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत 10.60 लाख रुपये आहे. संबंधित आस्थापनाच्या परवाना आणि लेबलिंगविषयक नियमांच्या पालनाबाबत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पुणे विभागात बदाम आणि काळ्या बेदाण्यांवर कारवाई

पुणे विभागात फुटाणे डाळ, बदाम, बेदाणे, तीळ आणि इतर अन्नपदार्थांच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मे. रिकी रेडर्स येथून 478 किलो फुटाणे डाळ जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत 53,775 रुपये आहे.

पुनित बालन ग्रुप आणि डुकाटीची हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये ‘पीबीजी डुकाटी रेसिंग’ची एंट्री

तसेच मे. एस. एस. सेल्स कॉर्पोरेशन येथून 358 किलो बदाम, तर मे. निर्मल कोल्ड स्टोरेज येथून 493 किलो काळे बेदाणे जप्त करण्यात आले. बदामाची किंमत 3 लाख 58 हजार रुपये, तर काळ्या बेदाण्यांची किंमत 2 लाख 46 हजार 500 रुपये आहे. या साठ्यांमध्ये लेबलविषयक त्रुटी आणि गुणवत्ता मानकांच्या उल्लंघनाचा संशय आल्याने कारवाई करण्यात आली.

कोकणात खाद्य गोंद, गूळ आणि मध जप्त

कोकण विभागात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करताना मे. संजय ब्रदर्स येथून 1,298 किलो खाद्य गोंद (डींक) जप्त करण्यात आला. त्याची किंमत 2 लाख 69 हजार 600 रुपये आहे. तसेच मे. पेशवाई अमृततुल्य चहा येथून गूळ, गूळ पावडर आणि मधाचा 631 किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत 1 लाख 43 हजार 400 रुपये आहे.

देवाभाऊंना नाकीनऊ आणण्याचं होतं पण, बिचुकलेंची गाडी शिक्षकांनी 19 मतांवरच अडकवली…

संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि मानकांबाबत संशय आढळल्याने प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली.

मुंबईत मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी

मुंबई विभागात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, तांदूळ आणि इतर अन्नपदार्थांच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली. मे. यशोदा डेअरी येथून दूध पावडर, म्हशीचे दूध आणि पनीर असा 250.50 किलो साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 76,510 रुपये आहे.

मे. क्लासिक एंटरप्रायझेस येथून 296 किलो तुटलेला तांदूळ जप्त करण्यात आला. त्याची किंमत 35,520 रुपये आहे. मे. गीतांजली केटरिंग सर्व्हिसेस येथून 72 किलो मोहनथाळ, तर मे. अदिरहंत स्वीट्स येथून 240.50 किलो विविध मिठाई जप्त करण्यात आली. या मिठाईमध्ये अतिरिक्त रंगांचा वापर केल्याचा संशय असल्याने पुढील कार्यवाही करण्यात आली.

राजन पाटील ठरले चार आमदारांचे मामा; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटीलांच्या विजयानंतर राजकीय नातेसंबंधांची चर्चा

छत्रपती संभाजीनगर विभागातही कारवाई

छत्रपती संभाजीनगर विभागात बीड येथील मे. मंगलमूर्ती ट्रेडिंग कंपनीकडून 388 किलो मिलेट उत्पादनांचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 62,080 रुपये आहे. तसेच अहमदपूर येथील मे. रेड्डीज एजन्सीकडून 195 किलो दूध बिस्किटांचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत 27,840 रुपये आहे. हे पदार्थ निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीचे लेबल असलेले असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला.

अन्नपदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन

अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 तसेच संबंधित नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्नपदार्थांची साठवणूक स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी करावी, आवश्यक परवाने व नोंदणी घ्यावी आणि लेबलिंगचे नियम पाळावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, निखिल वागळेंची माफी स्वीकारली; नेमकं प्रकरण काय?

नागरिकांनी परवानाधारक किंवा नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत. खरेदीपूर्वी लेबल, बॅच क्रमांक, पॅकिंगची तारीख आणि ‘Best Before’ ही माहिती तपासावी. निकृष्ट, कालबाह्य किंवा संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास FDA च्या 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा अधिकृत तक्रार पोर्टलवर https://complaints.mahafda.in तक्रार नोंदवता येईल.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा तपासण्या आणि कायदेशीर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version