यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही ; आर्थिक अडचणींमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय

Anandacha Shidha : यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

Anandacha Shidha

Anandacha Shidha

Anandacha Shidha : यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधावाटप न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. आर्थिक अडचणींमुळे राज्य सरकारने शिधावाटप न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

राज्यात असणाऱ्या दुष्काळात नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार अशी अपेक्षा होती मात्र आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) मिळणार नाही. राज्य सरकारने 2022 मध्ये ही योजना सुरु केली होती. माहितीनुसार या योजनेच्या प्रत्येक वितरणासाठी साधारण 550 ते 600 कोटी रुपयांचा खर्च येतो त्यामुळेच राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

योजना कधी सुरू झाली?

आनंदाचा शिधा योजना 2022 च्या दिवाळीपासून सुरू करण्यात आली. सुरुवातीला रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल असा संच 100 रुपयांमध्ये देण्यात आला. पुढील वर्षांत किटमध्ये पोहे आणि मैदा यांचा समावेश करण्यात आला होता.

कोणाला लाभ मिळत होता?

– अंत्योदय अन्न योजना (AAY)शिधापत्रिकाधारक

– प्राधान्य कुटुंब (PHH)शिधापत्रिकाधारक

-तसेच 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील पात्र APL केशरी शेतकरी रेशनकार्डधारक. यामध्ये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचा समावेश होता.

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदे? धनुष्यबाणाचा फैसला कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी तारीख

Exit mobile version