Maharashtra Government help to Marathi Schools in America for Curriculum : अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या एँड आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
Kalyan Crime : रमीच्या नशेत चोरीचा गेम! धावत्या ट्रेनमधील महिलांचे दागिने लांबविले…
सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून “मराठीचा संस्कार” आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात. सन 2005 पासून ही शाळा चालवली जाते. सुमारे 300 विद्यार्थी इथे मराठी शिकत आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! वर्षातून एकदा मिळणार महिनाभर रजा
अमेरिकेत अशा 50 हून अधिक शाळा या मराठीच्या असून काही सेवा भाव ठेवून इथली मराठी माणसे या शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकवणे, परिक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले.
VIDEO : ‘मराठीला अभिजात दर्जा कशाला हवा? ‘ केतकी चितळेचा सवाल, सोशल मीडियावर संताप…
दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल. असे आश्वासन मंत्री शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला दिले आहे.
मराठीला अभिजात दर्जा कशाला हवा?
नेहमीच आपल्या थेट आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली. यावेळी तिच्या विधानाने थेट मराठी भाषेच्या अभिजात (Marathi Language) दर्जा मिळवण्याच्या मागणीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओत केतकीने म्हटलंय की, मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? ही तर फक्त ‘इन्सिक्युरिटी’ आहे.
केतकीचा संतापजनक सवाल
केतकी चितळे म्हणाली की, मराठी बोलायला कुणी सांगितलं की लोक चिडतात, पण खरंच विचार केलात, तर कुणी मराठीत न बोलल्यानं मराठी भाषेला काही इजा होते का? मराठी बोल म्हणणाऱ्यांना मी विचारते, कुणी बोललं नाही तर भोकं पडतात का भाषेत? काहीच होत नाही. ही तुमची स्वतःची असुरक्षितता आहे.