Download App

सरकारी जाहिरातीत झळकला पण त्याच योजनेत अपात्र ठरला; परदेशी शिक्षणाचं स्वप्न अधुरं

या सरकारी जाहिरातीत जो युवक झळकला होता तोच युवक त्या योजनेसाठी अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra News : महायुती सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या (Maharashtra News) अंमलबजावणीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. इतकंच नाही तर योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सरकार मोठा खर्च करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात (Maharashtra Elections 2025) अशीच एक मोठी जाहिरात सरकारने केली होती. परंतु, आता या जाहिरातीचं बिंग फुटलं आहे. या सरकारी जाहिरातीत जो युवक झळकला होता तोच युवक त्या योजनेसाठी अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने लोकांना सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी जाहिरातीबाजी केली होती. सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, यू ट्यूब चॅनल्स, टीव्ही चॅनल्स यांसारख्या माध्यमातून जाहिरातींचा भडीमार करण्यात आला होता. या जाहिरातीत अशीही एक जाहीरात होती जिचं बिंग आता फुटलं आहे. या जाहितीत ज्या युवकाला परदेशात शिक्षणाची संधी मिळाली असं सांगण्यात आलं होतं त्याच युवकाला या योजनेतून अपात्र केल्याची माहिती आता समोर आली आहे.

Mahayuti Disputes : खात्री करूनच वक्तव्ये करावी, योगेश कदमांची बाजू घेत उदय सामंतांनी नितेश राणेंना फटकारले !

ओबीसी विद्यार्थ्याचं परदेशी शिक्षण पूर्ण झाल्याची जाहिरात होती. या जाहिरातीत रोहित दिवसे नावाचा युवक दिसला होता. पण याच रोहितची परदेशी शिष्यवत्ती सरकारने नाकारली आहे. या योजनेसाठी तो अपात्र ठरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात ही जाहिरात दाखवण्यात आली होती. ओबीसी विद्यार्थ्याचं परदेशी शिक्षण पूर्ण झाल्याची ती जाहिरात होती. जाहिरातीत रोहितचा फोटोही होता. तांत्रिक कारणे देत रोहित दिवसेला ओबीसी विभागाने अपात्र ठरवले आहे.

या कारणामुळे रोहित दिवसे या योजनेसाठी अपात्र ठरला आहे. आता त्याचं परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. परंतु, राज्य सरकारने अशी जाहिरात का केली? जाहिरातीसाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्याची माहिती सरकारी यंत्रणांकडे नव्हती का? ओबीसी विभागाने कोणती तांत्रिक कारणे देत रोहित दिवसेला या योजनेसाठी अपात्र ठरवलं? असे प्रश्न आता उपस्थित केला जात आहेत.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! लोककला अन् लोकवाद्य शिकणाऱ्यांंना राज्य सरकार देणार शिष्यवृत्ती

follow us