Download App

नितेश राणेंचा खळबळजनक दावा! म्हणाले, संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत ?

Nitesh Rane : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत हे येत्या 10 जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या बैठका झाल्या असून त्यासंदर्भात बोलणीही सुरू आहेत, असा दावा राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राणे पुढे म्हणाले, राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्या वेळची भूमिका पाहिली किंवा त्याआधीची भूमिका पाहा ते त्यावेळी अजित पवारांवर टीका करत होते. अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी लगेच पक्षात प्रवेश करतो असे राऊत पवारांना म्हणाल्याचे राणे यांनी सांगितले.

https://letsupp.com/politics/maharashtra-abhijeet-patil-president-of-vitthal-sugar-factory-joins-ncp-43382.html

संजर राऊत यांनी शरद पवार यांना आता शिवसेनेचे काही खरे नाही. उद्धव ठाकरेंचेही काही खरे नाही. तेव्हा मला तुमच्या पक्षात घ्या, असे सांगितले आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील असे राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले, आम्ही बाळासाहेबांना नेहमीच सांगत होतो की संजय राऊत हा साप आहे. तो ना बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला ना तुमचा होणार. उद्या ज्यावेळी संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांचे इरादे समजतील. या एका माणसामुळं तुम्ही किती लोकांनी तोडलंत, असा सवाल राणे यांनी केला.

‘हे तर महाराष्ट्राचे वैरी, बाळासाहेब असते तर’.. शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर राऊतांची आगपाखड

शरद पवारांनी राजीनामा दिली त्यावेळी देशातील मोठ्या नेत्यांनी त्यांना विनंती केली की राजीनामा देऊ नका. पण, उद्धव ठाकरेंनी फोन केला का, असाही सवाल राणे यांनी केला. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न आहे का, असेही त्यांनी विचारले. स्वतःच्या माणसाला किती अडचणीत आणायचं याला सुद्धा काही मर्यादा असतात असा टोला राणे यांनी लगावला.

Tags

follow us