Download App

‘आता ‘सामना’ची आग थांबवावीच लागेल’; फडणवीसांवरील टीका बावनकुळेंनाही झोंबली!

Chandrashekhar Bawankule : सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आल्याने भाजपाचे नेते कमालीचे संतापले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेतला. सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर जी टीका करण्यात आली. त्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे, ती आग थांबवावीच लागेल असा इशारा त्यांनी मुंबईत दिला.

टीकाचं नाही तर, ‘उत्तर’ काय देणार; अजितदादा पेचात, बीडची सभा रद्द होणार?

सामना वृत्तपत्राविरोधात आमचे मुंबईचे नेते आणि कार्यकर्ते लढा देणार आहेत. यातून आंदोलनाची स्थिती निर्माण होऊ शकते. सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग आता थांबवावीच लागणार आहे. वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं आहे पण ते जर नियमाच्या बाहेर जाऊन काहीही लिहायला लागले तर ते खपवून घेतले जाणार नाही.

सत्ता गेल्याने उद्धव ठाकरेंचं डोकं काम करत नाही

सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बावचळले आहेत. त्यांचं डोकं काम करत नाही. पुन्हा सत्तेत येण्याची संधी नाही. पक्ष गेला, चिन्ह गेलं, राष्ट्रवादी भाजपसोबत आली आहे, पुन्हा कधी सत्तेत येऊ शकत नाही. हे दुःख उद्धव ठाकरे यांना आहे. हे दुःख सामनातून मांडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून चूक केली. ती आता यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मुखपत्रातून अशा पद्धतीने टीका करत असल्याचा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला.

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने अस्वस्थता; फडणवीस, सांभाळा! सामनातून टीकेचे बाण

सामनाची तक्रार करणार, रस्त्यावर उतरणार

सामना वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार आहोत. वृत्तपत्रात सुद्धा बोलण्याची, लिहिण्याची मर्यादा आहे. सामानाची आग आता थांबवावी लागेल. त्याचा विचार आम्ही करू. रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढणार आहोत, असे बावनकुळे म्हणाले.

Tags

follow us