‘तोच परिवार मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!’; मुंबई तुंबताच भाजपाचा ठाकरेंवर हल्लाबोल

Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]

Ashish Shelar Uddhav Thackeray

Ashish Shelar Uddhav Thackeray

Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर आता भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबईत पाऊस येण्याआधी नालेसफाईवर मोठा खर्च झाला. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारा व महापालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पावसाने रस्ते पु्न्हा तुंबल्याचे दिसत आहे. जेव्हा मुंबईत नालेसफाई सुरू होती. भाजपाने उन्हातान्हात उतरून पाहणी करून नालेसफाईची कामे असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

वर्षानुवर्षे तेच कंत्राटदार, तीच पद्धत, तीच अपारदर्शकता, अधिकाऱ्यांची तीच लपवाछपवी त्यामुळे कालच्या पहिल्याच पावसात पालिकेचे दावे वाहून गेले. पालिकेने अजूनही कंत्राटदाराची बाजू न घेता काही उपाययोजना करता आल्या तर कराव्यात. वर्षानुवर्षे पालिकेने कंत्राटदाराची काळजी घेतली आता मुंबईकरांची काळजी करावी. बाकी मुंबईकरांचे तथाकथित रखवालदार उबाठाचे माजी नगरसेवक, माजी महापौर या काळात गायब होते आणि उबाठा प्रमुख (उद्धव ठाकरे) लंडनमध्ये थंड हवा खात होते. त्यामुळे उबाठाने वर्षानुवर्षे पोसलेल्या कंत्राटदारांमुळे यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत जी परिस्थिती उद्भवेल त्यावेळी.. उबाठा गटाने आपल्या तोंडाची गटारे बंदच ठेवावीत. उबाठा आणि उबाठाचे पाळीव कंत्राटदार हा जो एक परिवार झाला, तोच मुंबईकरांचा खरा गुन्हेगार! अशा शब्दांत शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री शिंदे उतरले मुंबईच्या रस्त्यांवर 

कालपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासांत मोसमी वारे मुंबईत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मागील 24 तासांत मुंबईत 176.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी आज वरळीतील कोस्टल रोड परिसराची पाहणी केली. या भागात पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.

Exit mobile version