Download App

निळवंडेचं पाणी सुटलं, आता श्रेयवादाची लढाई; जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने…

Jayant Patil : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वाहते झाल्यानंतर आज या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे धरणाच्या कामाला गती मिळाली आणि आज कालव्यातून पाणी सोडता आल्याचे सांगितले. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले, कोविडची भयंकर परिस्थिती असतानादेखील आम्ही न थांबता निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे आज समाधान वाटत आहे. नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ करण्यात आला ही आनंदाची बाब आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

https://letsupp.com/maharashtra/hsc-result-student-examssc-result-date-annnaoused-52865.html

१९७० ते २०१९ पर्यंत या धरणाच्या कामासाठी ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत जवळपास ९०० कोटींचा निधी देऊन या धरणाचे ९० टक्के काम पूर्ण केले. स्वतः जलसंपदा मंत्री म्हणून धरणाच्या कामाला ३ वेळा भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

फडणवीस काय म्हणाले?

अडीच वर्षांच्या सरकारमध्ये चारशे-साडे चारशे कोटी रुपये मिळले. पण तेही आम्ही 2019 मध्ये जे अर्थसंकल्पात मंजूर केले होते, त्यानंतर पैसे मिळाले नाही. शिंदे सरकार आल्यानंतर कपूर यांना सांगितलं की पुन्हा आपल्याला याची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे. त्यानंतर जवळपास 5 हजार 177 कोटींची नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये आणली आणि मार्च 2023 मध्ये मान्यताही दिली. तसंच यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोसेखुर्दनंतर सगळ्यात जास्त पैसे कोणत्या प्रकल्पाला दिले असतील तर ते निळवंडे धरणाला दिले आहेत. जलयुक्त शिवारमधूनही अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख 98 हजार हेक्टर शेती ओलिताखाली आली असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलंय, त्यांनी लकव्याबाबत.. राऊतांचा घणाघात

Tags

follow us