Download App

अजितदादांनी शरद पवारांची भेट का टाळली? रोहित पवार म्हणाले, मला वाटतं…

Rohit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, त्याचवेळी अजितदादा मात्र पवारांच्या मागच्या बाजूने आले आणि जातानाही मागूनच निघून गेले. या प्रसंगाची राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू आहे. यावर आता अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन्स भाजपाने संभाजी भिडेंना दिले आहे का ? पटोलेंचा थेट सवाल

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, याबाबत आपण अजितदादांनाच विचारलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मु्द्दा काही लोकं असं म्हणत आहेत की पवार साहेब सगळ्यात आधी एकटे आले आणि जातानाही एकटेच गेले. आता तिथे जे काही पदाधिकारी होते ते सगळे मोठे नेते होते. पवार साहेबांबरोबर नेते असतातच असं नाही तर त्यांच्याबरोबर सामान्य माणसं जास्त असतात. ज्यावेळी पवार साहेब लोकांत जातात त्यावेळी शेतकरी, कष्टकरी, युवा हे लोक त्यांच्याबरोबर असतात आणि हीच खरी पवार साहेबांची ताकद आहे.

आपण एखाद्या व्यक्तीच्या समोर का जात नाहीत याला वेगळी वेगळी कारणे आहेत. ती कारणं त्या दोघांनाच माहिती असतील. यावर मी काही बोलणार नाही. पण याद्वारे जो काही संदेश जायचा तो गेला आहे. या सगळ्यांवर चर्चा करण्यापेक्षा ते जे व्यासपीठ होतं आणि तिथून पवार साहेबांनी जो संदेश दिला याकडे बघण्याची जास्त गरज आहे.

कर्जत MIDC वादात नवा ट्विस्ट! रोहित पवारांनी टाळलं राजकीय क्रेडिट; शिंदेंनाही सुनावलं

आता अनेक लोक म्हणाले की पवार साहेबांनी त्या व्यासपीठावर जायला नको होतं. पण, माझं तर असं म्हणणं आहे की पवार साहेबांनी एक मजबूत संदेश दिला आहे. तो कुणाला दिला तर आजच्या राज्यकर्त्याना दिला आहे. तो काय दिला तर आम्ही ज्या काळात राजकारण करत होतो ते अशा पद्धतीचं होतं. आम्ही प्रत्येक ठिकाणी राजकारण आणत नव्हतो. ते सामाजिक व्यासपीठ होतं तिथं राजकारण आणू नये हा संदेश पवार साहेबांनी तिथं दिला.

Tags

follow us