Download App

Maharashtra पोलिसांना मिळणार नवे ‘बॉस’ : रश्मी शुक्लांची शिफारस, चार अधिकाऱ्यांचीही नावे चर्चेत

  • Written By: Last Updated:

Maharashtra Police : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने आणि ते पोलीस सेवेतेून निवृत्तही होत असल्याने महाराष्ट्र पोलीस दलाला नवे महासंचालक मिळणार आहेत. यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 वर्ष सेवा झालेल्या सर्व ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नावे राज्य सरकारकडून मागवून घेतली आहेत.

ओबीसींच्या एल्गार सभेकडे पाठ! पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत पंकजा मुंडेंनी सांगितलं ‘इंटर्नल पॉलिटिक्स’

सध्या नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नियमानुसार यामध्ये केंद्रीय लोकसेवाकडे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात ज्येष्ठ अधिकारी असल्याने सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला यांच्या महासंचालक पदासाठी नावाच्या चर्चेमुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.

Aditya Thackery यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

शुक्ला यांच्यासोबतच 1989 च्या तुकडीतील संदीप बिष्णोई, विवेक फणसाळकर, प्रज्ञा सरवदे, भूषण कुमार उपाध्याय त्याचबरोबर 1990 च्या तुकडीतील जयजित सिंग, संजय वर्मा, अतुलचंद्र कुलकर्णी, बिपिन कुमार सिंग यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले आहेत. तर 1992 च्या तुकडीतील प्रशिक्षण तांत्रिक कारणामुळे 1993 मध्ये घेण्यात आलं होतं. त्यामुळे तत्कालीन अधिकारी अद्याप तीस वर्षांची सेवा पूर्ण असणे या अटीला पात्र ठरत नसल्याने त्यांची नावे यामध्ये घेण्यात आलेली नाहीत. अशी माहिती देण्यात आली आहे.

ठाण्याला मिळणार नवे पोलीस आयुक्त :

दरम्यान महासंचालक पदासाठी सध्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त असलेल्या जयजित सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता ठाण्याला नवे आयुक्त कोण येणार असा सवाल विचारला जात आहे. तसेच जयजितसिंग यांना दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना पदोन्नती देखील मिळाली आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये नवे आयुक्त कोण असणार? याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात ठाणे हा शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने शिवसेनेचा कल अमिताभ गुप्ता किंवा प्रशांत बोरडे यांच्याकडे आहे. तर भाजपची पसंती आशुतोष डुंबरे किंवा अनिकेत कौशिक यांना असल्याचे बोलले जाते.

Tags

follow us