Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत.
त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अपात्र होणार का? शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाणार का? मग कोण मुख्यमंत्री होणार अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. दरम्यान या दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे.
दरम्यान यावर घटनातज्ज्ञांनी आपली मत व्यक्त केली आहेत. यामध्ये उल्हास बापट यांनी सांगितले की, ‘बहुमतासाठी सत्र बोलावलं होत. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने हे रद्द केलं तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतात. याला ‘स्टेटस को अॅंटी’ काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने तसं केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे बाहेर पडलेले पहिले सोळा आमदार घटनेनुसार अपात्र ठरतील कारण पक्षातून बाहेर पडताना तुमचं संख्याबळ हे दोन तृतीयांश हवं किंवा तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागत. तर त्यांचं सदस्यत्व वाचत.’
Shinde Vs Thackeray : सत्तासंघर्षात आत्तापर्यंत काय-काय घडले? जाणून घ्या एका क्लिकवर
त्यामुळे आता काय होणार? शिवसेनेचे आमदार अपात्र होणार का? शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाणार का? मग कोण मुख्यमंत्री होणार अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत सर्व पाचही न्यायाधीशांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे एकच न्यायाधीश या निकालाचं वाचन करणार आहेत.