Maharashtra Political Crisis Live : राष्ट्रावादीतील बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकांचे सत्र पार पडले. यामध्ये अजित पवारांनी पवारांना वय झालय आता तरी थांबणार आहात की नाही? असा थेट सवाल केला. तर, दुसरीकडे पवारांनी पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही जाऊ देणार नाही असे ठामपणे अजितदादांना सांगितले आहे. त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या सर्व घडामोडींचा आढावा घेणारा लाईव्ह ब्लॉग….
बंडानंतर अजित पवार यांच्या ९ मंत्र्यांची शपथ होते, पण बाशिंग बांधून बसलेल्यांना शपथ दिली जात नाही असे म्हणत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार हे नक्की आहे असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. हा आऊटघटकेचा खेळ आहे आणि होता हे अपेक्षितच होतं. ही परिस्थिती त्यांनी स्वत:हून घेतली आहे. स्वाभिमान असेल तर राजीनामे द्या.९० जागा अजित पवार मागत आहेत तर शिंदेना किती तुकडे मिळणार आहे ? असा सवाल करत शिंदेसोबत चर्चादेखील कोणी करणार नाही असेदेखील राऊत म्हणाले.
दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर लावण्यात आले असून,आज दिल्लीत राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत असणार आहेत.
आम्ही सरकारमध्ये सामील होण्याच्या अगोदर त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि सह्या घेतलेल्या आहे. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहे आणि राहतील. निर्णय घेण्याआधी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे. यासाठी पक्षाची घटना पूर्णपणे आम्ही पाळली आहे. निवडणून आयुक्तांकडे असलेले नियम पाहून त्यांची मांडणी करण्यात आलेली आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये अनेक बैठका झाल्या. मार्ग निघाला नाही, त्यामुळे आम्ही पुढे गेलो. अजित पवारच पक्षाचे प्रमुख राहतील; शरद पवारांनी भाजपशी चर्चा करून सातत्याने शब्द फिरवला, छगन भुजबळांनी डागली पवारांवर तोफ