फाइल मिळाली पण, बंगले गायब ! ठाकरेंच्या बंगला घोटाळ्याची चौकशी करा; सोमय्यांची मागणी

Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील ही 19 बंगल्यांची फाइल मला मिळाली आहे. 80 पानांची ही फाइल आहे. मंत्रालयाने काल मला ही फाइल दिली. फाइल मिळाली असली तरी ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (69)

Kirit Somaiya

Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील ही 19 बंगल्यांची फाइल मला मिळाली आहे. 80 पानांची ही फाइल आहे. मंत्रालयाने काल मला ही फाइल दिली. फाइल मिळाली असली तरी ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले नाहीत.

तेव्हा, ठाकरेंनी केलेल्या या बंगल्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Amol Kolhe : उदयनराजे भोसलेंचा पाठिंबा पण सगळ्याच गोष्टी राजकारणात आणल्या तर…

ते पुढे म्हणाले, या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करावी किंवा अन्य तपास यंत्रणांची मदत घ्यावी. अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 21 एप्रिलला मुख्यमंत्री कार्यालय आणि महसूल कार्यालयाने फाईल एकमेकांकडे असल्याचं सांगितलं होतं. काल महसूल मंत्रालयाकडून मला फोन आला की महसूल मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या कपाटात ही फाईल होती. खरंच ती फाईल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कपाटात होती का, असा सवाल करत अशी ही बनवाबनवी असे या फाइलला नाव देणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

सत्तार भावनिक माणूस, सत्तारांच्या वक्तव्यावर विखेंचं स्पष्टीकरण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना फक्त जागेवर जाऊन फोटो काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी जो प्रॉपर्टी टॅक्स भरला होता आणि अन्वय नाईक यांच्याकडून बंगले घेतल्या संदर्भातील मी पुरावे पत्रकार परिषदेत दिले होते. या फाईल मधील अनेक कागदपत्रे आणि मी दिलेले पुरावे हे गायब केले गेले आहेत.

खोटी प्रॉपर्टी उभी केल्यासंदर्भात रश्मी ठाकरे विरोधात खरंतर उद्धव ठाकरे यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे होता. ज्या अधिकाऱ्यांनी या रिपोर्टवर सह्या केल्या आहेत ते अधिकारी सुद्धा दोषी आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला.

Exit mobile version